आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोळकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरला सशर्त जामीन, पुरावे नष्ट केल्याचा आहे आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेले सनातनचे वकील संजीव पुनाळेकरला जामी मंजूर झाला आहे. काही अटीसोबत त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला. सीबीआय ऑफीसला सोमवारी आणि गुरुवारी हजर राहणे, परवानगीशिवाय परदेशात न जाणे, साक्षीदारावर दबाव टाकू नये, सीबीआयने बोलवल्यास हजर राहणे अशा अटींसहित त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर आरोपी शरद कळसकरला पुरावे नष्ट करण्यास सांगितल्याचा आरोप पुनाळेकरवर आहे. यावेळी, पुरोगाम्यांच्या दबावामुळे पुनाळेकरवर कारवाई केल्याचा आरोप सनातनने लावला आहे. तसेच पुनाळेकरच्या पाठीशी असल्याचे सनातनने सांगितले आहे.

 

पुनाळेकरवर दाभोळकरांच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करणे, कटात समाविष्ट असणे आणि आरोपांनी मार्गदर्शन करणे असे आरोप आहेत. दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांनी खूनासाठी वापरलेले पिस्तुल नष्ट करण्यास मदत केली. 

बातम्या आणखी आहेत...