आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता कर थकवणाऱ्या 4,500 मिळकतदारांना जप्ती वाॅरंट; 31 डिसेंबरपर्यंत भरणा केला नाही तर बसणार बाेजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेने दैंनदिन खर्च भागवणे अवघड असल्याने मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी कठाेर पाऊल उचलले अाहे. गेल्या अनेक वर्षांपासून ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या सुमारे ४ हजार ५०० मिळकतदारांना जप्तीचे वारंट बजावले अाहेत. जप्ती वारंट बजावूनही ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी न भरणाऱ्या मिळकतीवर पालिका प्रशासन बाेजा बसवणार अाहे. त्यासाेबत वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून थकबाकी असलेल्या मिळकतदारांनाही जप्ती वाॅरंट बजावण्यात येणार अाहेत.

 

महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे व मालमत्ता करांची वसुली हे पालिकेचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्राेत अाहेत. गाळेप्रश्न गेल्या सहा वर्षांपासून न्यायालयीन व राजकीय तिढ्यात अडकल्याने त्यातून महापालिकेला शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाेबत हजाराे मिळकतदारांनी अनेक वर्षांपासून मालमत्ता कराचा भरणा केलेला नसल्याने महापालिकेला दैनंदिन स्वच्छता, पाणीपुरवठ्याचे वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार यावर खर्च करण्यासाठी निधीची उपलब्धता हाेत नाही. त्यामुळे पालिकेने मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी कठाेर पाऊले उचलली अाहेत. महापालिकेची चालु वर्षातील पालिकेची चार प्रभागातील १ लाख १ हजार ८८२ एवढ्या मिळकतींची मालमत्ता कराची मागणी ८८ काेटी ४४ लाख ७० हजार १२१ एवढी अाहे. गेल्या महिन्याभरात मालमत्ता कराची थकबाकी ५० हजारापेक्षा जास्त असलेल्या ४ हजार ५०० मिळकतदारांना जप्ती वारंट पालिकेतर्फे बजावण्यात अाले अाहेत, अशी माहिती महापालिकेचे अपर अायुक्त चंद्रकांत खाेसे यांनी सांगितले. दरम्यान, डिसेंबरअखेर करवसुलीची धडक माेहीम हाती घेण्याचे संकेतही मिळाले अाहेत.

 

थकबाकीरांच्या मालमत्तेवर बसणार बाेजा
मालमत्ता करांची थकबाकी ५० पेक्षा जास्त असलेल्या मिळकतदारांना जप्ती वारंट बजावण्यात अालेले अाहे. त्यांनी ३१डिसेंबरपर्यंत थकबाकी भरणे अपेक्षित अाहे. थकबाकी न भरल्यास त्यांच्या मालमत्तेवर बाेजा चढविण्याची कारवाई जानेवारीत करण्यात येणार अाहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला थकबाकीदारांची यादी देण्यात येणार अाहे. दरम्यान, मालमत्ता कराचा भरणा मार्च महिन्यांपर्यत न करणाऱ्या मालमत्ताधारकही थकबाकीच्या यादीत येणार असून अश्या सामान्य थकबाकीदारांनाही जप्ती वारंट बजावण्यात येईल.

 

थकबाकीदारांना अमृतचे नळ कनेक्शन नाही
मालमत्ता कराची २० डिसेंबरपर्यंत थकबाकीपाेटी ७ काेटी १४ लाख ६६ हजार ५२६ एवढी थकबाकी वसुली झाली अाहे. त्यासाेबत चालु वर्षातील २४ काेटी ८०९ अशी एकूण २९ काेटी १४ लाख ६७ हजार ३३५ रुपये वसुली झाली अाहे.

 

३० डिसेंबरला रविवार असला तरी कर भरणा केंद्र सुरू राहणार
मालमत्ता कर थकबाकी असलेल्या मिळकतदारांना अमृत याेजनेतंर्गत नव्याने देण्यात येणारे नळ कनेक्शन न देण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली अाहे. थकबाकी भरणे त्यासााठी बंधनकारक अाहे, असे अप्पर अायुक्त खाेसे म्हणाले.

 

बातम्या आणखी आहेत...