आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सत्तास्थापनेच्या चर्चेतून मित्रांमध्ये वाद, मित्राचा कान चावून तोडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या चार दिवसांत तर वेगवेगळी राजकीय समीकरणे बनत आणि बिघडत आहेत. या राजकारणाच्या चर्चा चौकाचौकात झडत असून त्यातून वितंडवाद होत आहेत. त्यातच निलंगा तालुक्यातील इनामवाडी गावात अशा चर्चेचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एकाने आपल्या मित्राचाच कान तोडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. 

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार निलंगा तालुक्यातील इमानवाडी येथे मंगळवारी सायंकाळी गावातील चौकात रत्नाजी नाईकवाडे, शैलेश नाईकवाडे, संदीप शिंदे हे मित्र राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करीत बसले होते. त्यातील रत्नाजी हा भाजपचा समर्थक तर दुसरे काँग्रेस-आघाडीचे समर्थक. त्यांच्यातील चर्चेचे रूपांतर हळूहळू वादात झाले.  त्यातच रत्नाजी नाईकवाडे याने ‘तू भाजप पक्षाच्या विरोधात का बोलतो? ‘असे म्हणत संदीपच्या कानाला चावा घेतला. यामध्ये संदीपचा अर्धा कानच तुटला. चर्चेचे रूपांतर हाणामारीत झाले. ग्रामस्थांनी या मित्रांचे भांडण सोडवले.  संदीपवर निलंग्यात उपचार सुरू आहेत.  याप्रकरणी संदीपचा भाऊ सागरने निलंगा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री उशिरा  गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल हणमंत पडिले करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...