आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Conflict Between Kangana Ranaut And Swara Bhaskar Ends, Swara Reaches Screening Of 'Judgmental Hai Kya'

कंगना रनोट आणि स्वरा भास्कर यांच्यातील वाद संपला, 'जजमेंटल है क्या' च्या स्क्रीनिंगला पोहोचली स्वरा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : स्वरा भास्कर आणि कंगना रनोटने 'तनु वेड्स मनु' सीरीजमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या होत्या की, दोघींमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाले आहेत आणि तेव्हापासून दोघींचे एकमेकींशी बोलणे बंद झाले आहे. मात्र, स्वरा आणि चित्रपट दोग्दर्शक आनंद एल रायने या बातम्यांचे नेहमीच खंडन केले. पण यानंतरही दोन्ही अभिनेत्री कधीच एकत्र दिसल्या नाहीत. अशातच जेव्हा स्वरा, कंगना स्टारर चित्रपट 'जजमेंटल है क्या' च्या स्क्रीनिंगला पोहोचली तेव्हापासून इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरु आहे की, दोघींमध्ये कोणताही वाद झालेला नाही आणि दोघींच्या मनात कोणतीही अढी नाही.  

 

कंगनाने खास लोकांना केले होते इनव्हाईट... 
सूत्रांनी सांगितले, 'कंगनाने चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग तिचे मित्र आणि चित्रपटाच्या कास्ट आणि क्रूसाठी ठेवले होते. या स्क्रीनिंगमध्ये इंडस्ट्रीमधून तिचे मित्र म्हणून रिया कपूर, राधिका मदान, जान्हवी कपूर आणि स्वरा भास्कर या दिसल्या. स्क्रीनिंगनंतर इंडस्ट्रीमध्ये हि चर्चा आहे की, स्वरा आणि कंगनामधील कथित वादाचा अंत झाला आहे.' 

 

'तनु वेड्स मनु' सीरीजमध्ये काम करू इच्छित नाही स्वरा...  
खूप दिवसांपासून अशी चर्चा आहे की, कंगना आणि आनंद 'तनु वेड्स मनु' च्या तिसऱ्या भागावर काम कारणार आहेत. हा चित्रपट स्वराचा एक्स बॉयफ्रेंड आणि रायटर हिमांशु शर्मा लिहू शकतो. त्याने या चित्रपटाच्या मागच्या दोन भागावरही काम केले आहे. चर्चा आहे की, स्वरा याच्या तिसऱ्या पार्टचा भाग बनू इच्छित नाही.