Home | Maharashtra | Vidarva | Akola | conflict between two people in kavad yatra

दोन कावडधारींमध्ये वाद; एकमेकांना मारले दगड, पोलिसांचा बळाचा वापर

प्रतिनिधी | Update - Sep 04, 2018, 12:00 PM IST

रामदासपेठ ठाणे हद्दीतून कावड मार्गक्रमण करताना दोन कावडधारी मंडळांत वाद झाला. वादाचे रूपांतर एकमेकांवर दगड मारण्यात झाल

  • conflict between two people in kavad yatra

    अकोला- रामदासपेठ ठाणे हद्दीतून कावड मार्गक्रमण करताना दोन कावडधारी मंडळांत वाद झाला. वादाचे रूपांतर एकमेकांवर दगड मारण्यात झाले. त्यानंतर आरसीपीचे कमांडो ंनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.


    पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या देखरेखीत सोमवारी बंदोबस्त तैनात होता. मात्र रामदासपेठ पोलिसांच्या ढिसाळ नियोजनानेे त्याला नख लागले. माळीपुऱ्यातून कावड मार्गक्रमण करताना दोन कावड पालखीत अंतर नसल्याने कावड एकमेकांना भिडल्या. मात्र काही कावडधारी युवक हातापायीवर आल्याने वाद झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या आदेशावरून आरसीपीचे कमांडो घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वातावरण शांत केले. रामदासपेठ पोलिसांचे ढिसाळ नियोजन मात्र बंदोबस्तादरम्यान दिसून आले.


    सीसीटीव्ही फुटेज पाहून एसपींचे पोलिसांना आदेश
    सोमवारी पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची बंदोबस्तावर नजर होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पाहून ते पोलिसांना आदेश देत होते. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील यांची परिस्थितीवर नजर होती. तर यात्रा मार्गाचे शूटिंगही पोलिसांनी केले. दोन डीवायएसपींसह गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे, विशेष शाखेचे प्रमुख अनिल जुमळे, जुने शहरचे ठाणेदार अन्वर एम. शेख, सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील, खदानचे ठाणेदार संतोष महल्ले, डाबकी रोडचे ठाणेदार सुनील सोळंके, अकोट फैलचे ठाणेदार राजू भारसाकळे, सिव्हिल लाइन्सचे ठाणेदार मोरे व रामदासपेठचे ठाणेदार शैलेश सपकाळ, राखीव पोलिस निरीक्षक विकास तिडके यांच्यासह १६ पोलिस निरीक्षक, ३६ एपीआय व पीएसआय, ४५० पोलिस कर्मचारी व २०० होमगार्ड यांचा ताफा बंदोबस्तादरम्यान रस्त्यावर होता.

Trending