रेल्वे रुळावरील मृतदेह / रेल्वे रुळावरील मृतदेह उचलण्यावरुन हद्दवाद; गाडी ३५ मिनिटे खाेळंबली

जळगाव रेल्वेस्थानकावर मंगळवारी पहाटे ३.४० वाजता धावत्या रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा मृत्यूू झाला. खांबा क्रमांक ४२०, ५ जवळ रुळावरच छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह पडून होता. मात्र, लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) हद्दवादामुळे मृतदेह उचलण्यास तब्बल ३५ मिनिटे विलंब झाला. त्यामुळे प्लॅटफाॅर्म क्रमांक ३ वर अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस चक्क ३५ मिनिटे उभी करुन ठेवण्यात अाली हाेती.

प्रतिनिधी

Sep 06,2018 11:25:00 AM IST

जळगाव- जळगाव रेल्वेस्थानकावर मंगळवारी पहाटे ३.४० वाजता धावत्या रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा मृत्यूू झाला. खांबा क्रमांक ४२०, ५ जवळ रुळावरच छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह पडून होता. मात्र, लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) हद्दवादामुळे मृतदेह उचलण्यास तब्बल ३५ मिनिटे विलंब झाला. त्यामुळे प्लॅटफाॅर्म क्रमांक ३ वर अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस चक्क ३५ मिनिटे उभी करुन ठेवण्यात अाली हाेती. यासंदर्भात बुधवारी लोहमार्ग विभागाचे सहायक पोलिस निरीक्षकांनी स्टेशन प्रबंधकांना लेखी निवेदन दिले. यात मृतदेहाची विटंबना झाल्यास आरपीएफ जबाबदार राहिली असे म्हटले आहे.


धावत्या रेल्वेतून पडल्याने रेल्वेस्थानकावर मंगळवारी पहाटे ३.४० वाजता खांब क्रमांक ४२०, ५ जवळ मृतदेह बराच वेळ पडून होता. आरपीएफच्या जवानांनी याबाबत काही एक दखल घेतली नाही. अखेर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे कर्मचारी अनिंद्र नगराळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी मृतदेह उचलण्यासाठी काही माणसे शोध्ून आणले. तोपर्यंत ३५ मिनिटे लागली. या वेळेत अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस प्लॅटफाॅर्मवरच थांबवून ठेवली होती. मृतदेह उचलल्यानंतर रेल्वे पुढील प्रवासाला निघाली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात अाहे.


आरपीएफकडून सहकार्य नाही
१ मृतदेह किंवा जखमींना उचलण्यासाठी स्टेशन प्रबंधकांचा मेमो आवश्यक असतो. तसेच मृतदेह किंवा जखमी व्यक्तीस रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी उचलून नेण्याची जबाबदारी असते. दरम्यान, जळगाव स्थानकावर कोणत्याही प्रकारचा अपघात घडला तरी आरपीएफकडून सहकार्य केले जात नाही.
२ मृतदेह उचलण्यापासून ते ओळख पटवून रुग्णालयात नेणे, नातेवाइकांना माहिती देणे, बेवारस असल्यास अंत्यसंस्कार करणे ही सर्व जबाबदारी लोहमार्ग पोलिसांनाच करावी लागते. त्यामुळे ही जबाबदारी आरपीएफने पार पाडावी, अपघात झाल्यास उद‌्घोषणा करुन आरपीएफला जागृत करावे, या मागणीसाठी लोहमार्ग पोलिस विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक सी.व्ही. आहेर यांनी बुधवारी स्टेशन प्रबंधक अरुण पांडे यांना लेखी निवेदन दिले आहे.

३ यासोबतच १९९८ च्या स्थायी आदेशाची कॉपीदेखील दिली आहे. या आदेशानुसार स्थानकावरील मृतदेह, जखमींना रुग्णालयात पोहचवण्याची जबाबदारी आरपीएफचीच असल्याचे आहेर यांनी निवेदनात नमूद केले आहे. दोन विभागांच्या असमन्वयामुळे अनेकवेळा मृतदेहांची अवहेलना होत आहे, जखमींना वेळेत उपचार मिळत नाहीत. शिवाय रेल्वे गाड्यांनादेखील विलंब होत असल्याचे या निवेदनातून स्पष्ट होते आहे.


ती आमची जबाबदारी नाही
स्थानकावरील मृतदेह, जखमींना हलवण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांचीच आहे. यासाठी त्यांना प्रत्येक घटनेच्या वेळी १ हजार रुपये देण्यात येतात. त्यांनी पाठविलेले निवेदन डीआरएम कार्यालयाला पाठवणार आहे. तेथून आलेल्या मार्गदर्शनानुसार पुढील काम करु.
- अरुण पांडे, स्टेशन प्रबंधक


गेल्या दहा दिवसांपूर्वीच अनोळखी मृतदेहाची अवहेलना
रेल्वे पोलिस व स्टेशन प्रबंधक यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे रेल्वेस्थानकावर एका डकमध्ये दोन दिवसांपासून मृतदेह पडून हाेता. नागरिकांनी ओरड केल्यामुळे अखेर शहर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नोंद केली. स्टेशन मास्तरने अखेरपर्यंत मेमो न दिल्यामुळे लोहमार्ग पोलिसही हतबल झाले होते. २६ आॅगस्ट रोजीच ही घटना समोर आली होती. या प्रकाराविषयी 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रसिद्ध करुन वाचा फोडली होती. या घटनेस १० दिवस होत नाहीत तोपर्यंत पुन्हा एकदा मृतदेह उचलण्यावरुन हद्दवादसमोर आला असून यामुळे संताप व्यक्त केला जात अाहे.


धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृद्धाचा मृत्यू
रेल्वे धक्क्यामुळे दिनकर देवरे (वय ६०, रा.हरिविठ्ठलनगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी ११.५० वाजता हरिविठ्ठलनगर परिसरातून जाणाऱ्या रेल्वेरुळावर घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना, असा परिवार अाहे.


मृतदेह, जखमी हलवण्याची जबाबदारी आरपीएफची
मृतदेह किंवा जखमींना हलवण्याची जबाबदारी आरपीएफचीच आहे. स्टेशन प्रबंधाकांकडून मेमो मिळण्यास अडचण होते. निधी देखील मिळत नाहीत. त्यांची जबाबदारी झटकल्यामुळे आम्हाला भुर्दंड बसतो.
- सी. व्ही. आहेर, सहायक पोलिस निरीक्षक, लोहमार्ग

X
COMMENT