औरंगाबादेत मराठा क्रांती / औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत गोंधळ, वादाचे चित्रकरण करणार्‍या पत्रकारांना धक्काबुक्की

दिव्य मराठी वेब टीम

Mar 05,2019 06:44:00 PM IST

औरंगाबाद- मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत गोंधळ झाला. वादाचे चित्रिकरण करणार्‍या पत्रकारांना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की केली. हॉटेल विंडसर कॅसल येथे मंगळवारी राज्यस्तरीय समन्वयकांच्या बैठकीत दोन गटात वाद झाला. या वादातून दोन गटात धक्काबुक्की झाली. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी हॉटेल विंडसर कॅसल येथे मंगळवारी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याआधीच अहमदनगरचे समन्वयक संजय भोर आणि मुंबईचे विनोद पोखरकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की आणि शिविगाळ केली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली औरंगाबादेतून मूक मोर्चाला सुरुवात झाली होती.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्या, अन्यथा..
आरक्षण सोडल्यास मराठा समाजाच्या 21 मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. सरकारच्या हातात असलेल्या मागणीही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. सरकारने निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात भूमिका घेईल, असा इशारा समन्वयकांनी औरंगाबादेतील बैठकीत दिला आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनरखाली सकल मराठा समाज एकत्र आला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून मराठा समाज संघर्ष करत आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासन मिळाले आहे. प्रत्यक्षात कृती झालेली नाही.


राज्यात एकूण 58 माेर्चे काढण्यात आले. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा व भूमिका ठरवण्यात येणार आहे. मराठा बांधवांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

X
COMMENT