आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्ष नेतेपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा', संजय राऊतांचे चिमटे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना दिल्या खोचक शुभेच्छा

मुंबई- भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास महाविगास आघाडीने हिरावून घेतला. काल मुंबईतील शिवतीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्र्यांना अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पण, यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या शुभेच्छाची सध्या चर्चा सुरू आहे. ''महाराष्ट्रात विरोधीपक्षच राहणार नाही, असा दावा करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्ष नेतेपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा." असे खोचक ट्वीट करत संजय राऊतांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकात पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. त्यासाठीदेखील संजय राऊतांनी दुसरे एक ट्वीट करुन या दोघांचे आभार मानले. "शिवसेना मुख्यमंत्री महोदयांच्या शपथग्रहण सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना मनापासून धन्यवाद. हे नाते असेच राहू दे." असे राऊतांनी लिहिले.  

बातम्या आणखी आहेत...