Home | National | Delhi | Congress 3 Announcement in 10 days

तीन वचने : काँग्रेसच्या 10 दिवसांत 65 टक्के मतदारांसाठी 3 घोषणा, सत्तेवर आल्यास तीन तलाक कायदा रद्द करू

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 08, 2019, 09:41 AM IST

450 लोकसभा जागांचा 65 टक्के मतदारांवर प्रभाव

 • Congress 3 Announcement in 10 days

  नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या एक महिना अगाेदर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने फ्रंटफूटवर खेळू लागले आहेत. ते जाहीरनाम्यात सामील होऊ शकणारी आश्वासने एकापाठोपाठ देऊ लागले आहेत. ही आश्वासने वेगवेगळी राज्ये किंवा व्यासपीठावरून दिली जात आहेत. एखाद्या सभेत राहुल लागोपाठ मोठमोठी आश्वासने देतात. दुसऱ्या सभेत मोदी सरकारच्या अपयशाची यादी वाचून दाखवतात. गेल्या दहा दिवसांत राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी ४ राज्यांतील विविध मंचावरून चार आश्वासने दिली.त्यापैकी तीन आश्वासनांचा देशात राजकीयदृष्ट्या प्रभाव दिसू शकतो. त्यात शेतकरी, आदिवासी व मुस्लिम मतदारांशी थेट जोडण्याचा प्रयत्न दिसतो. तीन वर्गात मिळून सुमारे ६० ते ६५ टक्के मतदारांचा समावेश होतो. यासंदर्भात गुरूवारी काँग्रेस अध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुखांनी काँग्रेस सत्तेवर आल्यास तीन तलाक रद्द करू, असे आश्वासन देऊन टाकले.

  जाहीरनाम्यातील आश्वासने जनतेत आणण्याचा राहुल व काँग्रेसचा अट्टहास


  ७ फेब्रुवारी नवी दिल्ली
  तीन तलाक कायदा रद्द करू

  दिल्लीत काँग्रेस अल्पसंख्यांक संमेलनात अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आसामातील खासदार सुश्मिता देव म्हणाल्या, २०१९ मध्ये सरकार येईल. तेव्हा कायदा रद्द करू.


  कारण : देशात सुमारे १६ टक्के मुस्लिम मतदार. १८ राज्यांत समुदायाची निर्णायक भूमिका आहे.

  ६ फेब्रुवारी आेडिशा
  आदिवासींना जमीन परत करू

  ६ फेब्रुवारी आेडिशा
  आदिवासींना जमीन परत करू


  राहुल आेडिशातील कालाहंडीमध्ये म्हणाले, छत्तीसगडमध्ये टाटाचा प्रकल्प ५ वर्षांत उभा राहिला नसल्याने आमच्या सरकारने आदिवासींनी जमीन परत केली. हे मॉडेल सत्तेवर आल्यास देशभरात लागू करू.

  कारण : देशात ८ टक्के आदिवासी मतदार. त्यांच्यासाठी ४७ टक्के जागा राखीव. ८० मतदारसंघावर परिणाम शक्य.

  तलाक का ? : एक महिन्यानंतर तीन तलाकबाबत काँग्रेसचे घूमजाव
  काँग्रेसने एक महिन्यापूर्वी हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत तीन तलाक विधेयकाला पाठिंबा दर्शवला होता. राज्यसभेत हा कायदा पारित झाला नाही. त्यानंतर माेदी सरकारने तिसऱ्यांदा विधेयकावर अध्यादेश काढला होता. मात्र आता काँग्रेसने आपल्याच भूमिकेवर घूमजाव केला आहे. लोकसभेच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन तलाकला मुस्लिम समुदायातून विरोध होत आहे. त्यातही मुस्लिम पुरूषांकडून विरोध होत आहे. देशात १४ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. ९ राज्यांत मुस्लिम लोकसंख्या १४ टक्क्यांहून जास्त आहे. ९ राज्यांत ७ ते १३ टक्के एवढी आहे.

  पाटणा विद्यापीठास केंद्रीय दर्जा
  ४ फेब्रुवारी बिहार
  बिहारच्या राजधानीत जन आकांक्षा सभेत राहुल गांधी यांनी काँग्रेस सत्तेवर आल्यास पाटणा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्याचे आश्वासन दिले.

  कारण : राज्यात लोकसभेच्या ४० जागा. प्रत्येक मतदारसंघात २५ ते ३० टक्के तरूण मतदार.

  शेतकऱ्यांना किमान उत्पन्न


  २९ जानेवारी छत्तीसगड
  राहुल गांधी यांनी रायपूरमध्ये शेतकरी आभार मेळाव्यात काँग्रेस २०१९ मध्ये सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना किमान उत्पन्नाची हमी देऊ, असे वचन दिले.
  कारण : देशात ६६ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात. सुमारे ५५ ते ६० कोटी शेतीसंबंधी मतदार.

Trending