आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress' Ajit Jogi Battles 11 Chandu Sahus In Chhattisgarh's News In Divya Marathi

अजित जोगींनी उभे केले दहा चंदूलाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - महासमुंदच्या जीई रोडवर मोठा मोहल्ला आहे बसना. इथल्या बसस्टँडच्या बाजूला झाडाच्या सावलीत बसलेले लोक राजकारणाच्या चर्चेत गुंग आहेत. मुद्दा आहे की, नरेंद्र मोदींची लाट जोगी थोपवू शकतील का? एक बुजुर्ग व्यक्ती बोलत होते : जोगी निवडणूक लढणे जाणतात. त्यांच्यावर मोदी लाटेचा काही परिणाम होणार नाही. त्यांच्या बोलण्याशी इतरही लोक सहमत आहेत.

छत्तीसगडमध्ये एकीकडे मोदींची हवा आहे, तर या हायप्रोफाइल सीटवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आपले मॅनेजमेन्ट आहे. मॅनेजमेन्ट यासाठी की, त्यांच्यासाठी येथे तीन प्रकारे प्रतिकूल स्थिती आहे. येथे आठपैकी सहा जागांवर भाजप व एका ठिकाणी भाजपच्या पाठिंब्यावरील अपक्ष आमदार आहे. फक्त धमतरीची जागा काँग्रेसकडे आहे. दुसरे भाजप उमेदवार चंदूलाल साहू ओबीसी व साहू कार्ड खेळत आहेत. तिसरे, मोदी लाट. मात्र जोगी म्हणतात की, ‘छत्तीसगडमध्ये मोदींची लाट नाहीये. विधानसभा निवडणुकीत मोदी जिथे गेले, तिथे भाजप हारली.’

परंतु आपल्या विजयासाठी जोगींनी चाल खेळली आहे. त्यांनी भाजपच्या चंदूलाल साहू यांच्या जातीच्या कार्डाच्या उत्तरादाखल राज्यभरात आपले ओबीसी नेते लावले आहेत. बिलासपूर जिल्ह्यातील बिल्हा आमदार सियाराम कौशिक त्यांच्या प्रचाराला लागले आहेत. ते म्हणतात, नेत्यासाठी आम्ही काम करतो. जोगींच्या कुटुंबातील आमदार पत्नी रेणु आणि आमदार पुत्र अमित आणि सून रिचाने आघाडी सांभाळली आहे. इकडे, चंदूलाल साहू म्हणतात, जोगी यापूर्वी महासमुंदचे खासदार होते. पण काही काम केले नाही.