आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी उभे होते नेते, अचानक झाला राडा, भर रस्त्यात एकमेंकाना बुटाने मारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायबरेली(उत्तरप्रदेश)- रविवारी संध्याकाळी प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी जमलेल्या नेत्यांनी एकमेंकाना बुटाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाबद्दल सांगण्यात येत आहे की, हिन्दू युवा वाहिनीच्या नेत्याने प्रियंका गांधी मुर्दाबादचे नारे लगावले आणि त्यांच्यावर अश्लील टिप्पणी केली. त्यामुळेच नाराज झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रत्यांनी भर रस्त्यातच मारहाण करणे सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सगळ्यांना शांत केले. पोलिस अधिक्षक सुनील कुमार सिंह यांनी सांगितल की, नेते आशीष पाठकने काँग्रेस जिलाध्यक्ष व्ही.के. शुक्ला आणि हिमांशु श्रीवास्तव यांच्यावर मारहाणीचा आरोप लावला आहे.


प्रियंका गांधींच्या स्वागतापुर्वी झाला राडा
प्रियंका गांधी लखनऊवरून प्रायगराजला जात होत्या तेव्हा हा सगळा प्रकार घडला. यावेळी रायबरेलीच्या सिव्हील लाइनमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यावेळी हिंदू युवा वाहिनीचे जिल्हा संयोजक आशीष पाठक आपल्या इतर कार्यकर्त्यांसोबत तिथे आले आणि प्रियंका गांधी मुर्रदाबादच्या घोषणा सुरू केल्या. यावेळी नाराज झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बुटाने मारणे सुरू केले.
 

बातम्या आणखी आहेत...