आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरु - कर्नाटकात 13 महिन्यांच्या काँग्रेस-जेडीएसच्या सरकार संकटात सापडत आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे 12 आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीसाठी गेले आहे. सदरील आमदार आपला राजीनामा देण्याचा अंदाज आहे.
वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार विधानसभा अध्यक्षांना भेटण्यासाठी गेले होते. याची माहिती अध्यक्षांना मिळाताच ते आमदारांची भेट न घेता तेथून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे नाराज आमदार पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देऊ शकतात. यामुळे आघाडी सरकार संकट असल्याचे दिसत आहे.
आमदार रामालिंगा रेड्डी, बीसी पाटिल, रमेश जारकिहोली, उमेश कामतल्ली, जेएन गणेश, बी नागेंद्र, बास्वाराज, एच विश्वनाथ, नारायण गौडा आणि गोपालाइया इत्यादी विधानसभा अध्यक्षांची भेट घेण्यासाठी विधानसभेत दाखल झाले होते. यापूर्वी सोमवारी आनंद सिंह यांनी राजीनामा दिला होता.
अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले - काँग्रेस आमदार
काँग्रेस आमदार रामालिंगा यांनी सांगितले की, मी अध्यक्षांकडे राजीनामा देण्यासाठी आलो आहे. माझी मुलगी (आमदार सौम्या रेड्डी) राजीनामा देणार की नाही याबाबत मला माहिती नाही. मी कोणावरही आरोप करत नाही. माझ्या अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचे मला वाटते आहे. यामुळे मी ही निर्णय घेतला आहे.
कोणीही राजीनामा देऊ नये - काँग्रेस
उपमुख्यंत्री शिवकुमार म्हणाले की, मी त्या आमदारांची भेट घेण्यासाठी जात आहे. तर कोणीही राजीनामा देऊ नका. राज्याचे उप मुख्यमंत्री जी परमेश्वर आणि डी के शिवकुमार यांनी बंगळुरुमध्ये सर्व आमदार आणि नगरसेवकांची बैठक बोलवली आहे.
12 आमदारांनी राजीनामा दिल्यावर काय होईल स्थिती?
12 आमदारांनी राजीनामा दिल्यास विधानसभेत एकूण 212 सदस्य राहतील. विधानसभा अध्यक्षांना सोडून ही संख्या 211 राहील. अशात बहुमतासाठी 106 सदस्यांची आवश्यकता भासणार आहे.
अपक्षांच्या समर्थनाने भाजपा स्थापन करू शकते सरकार
दोन अपक्ष आमदार कुमारस्वामी सरकारच्या कॅबिनेटमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. हे दोन्ही आमदार भाजपाला समर्थन देणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. असे झाल्यास भाजपाकडे 107 आमदारांचे समर्थन असेल. सरकार स्थापनेसाठी हा आकडा पुरेसा आहे.
कर्नाटक विधानसभेची सध्याची स्थिती
पक्ष | संख्याबळ |
भाजपा | 105 |
काँग्रेस | 78 |
जेडीएस | 37 |
बसपा | 1 |
केपीजेपी | 1 |
अपक्ष | 1 |
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.