आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोलेंच्या नावाची घोषणा, भाजपच्या किसन कथोरे यांच्याशी टक्कर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपमुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार निर्णय घेतील

मुंबई- महाराष्ट्राये नवनिर्वाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची बहुमत चाचणी आज होत आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने 170 जणांचे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. यातच विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला गेलं आहे तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले आहे. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी आमदार नाना पटोले यांचे नाव निश्चित झाले आहे.अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव होते. पण, आता अचानक काँग्रेसकडून नाना पटोले यांचे नाव समोर आलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण नाना पटोले हे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले बाजी मारतात की भाजपचे किसन कथोरे धक्का देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. पण, अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार हे घेतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...