आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Announces Second List Of Candidates, Including Vilasrao Deshmukh's Second Son DHIRAJ DESHMUKH

काँग्रेसने जाहीर केली 52 उमेदवारांची दुसरी यादी, विलासराव देशमुखांच्या दुसऱ्या चिरंजीवालाही मिळाली उमेदवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत 52 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेस आपली पहिली 51 उमेदवारांच्या नावाची यादी 29 सप्टेंबरला जाहीर केली. त्या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह 51 नावांचा समावेश होता.  या यादीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या दुसऱ्या चिरंजीवांचाही समावेश आहे. पहिल्या यादीत अमित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये प्रत्येकी 125-125 जागेचा फॉर्म्यूला ठरला आहे. मित्र पक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत. एकीकडे काँग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली. पण, राष्ट्रवादीने फक्त 5 उमेदवारांची नावे घोषित केली होती. त्यापैकी केज मतदारसंघातील उमेदवार नम्रता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उर्वरित 120 उमेदवार कधी जाहीर करणार हे याकडे सर्वांचे लक्ष आहे.