आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात काँग्रेसचा गुवाहाटीमध्ये हल्लाबोल मोर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटीत निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांत चांगलीच चकमक उडाली. - Divya Marathi
गुवाहाटीत निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांत चांगलीच चकमक उडाली.

नवी दिल्ली : देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात काँग्रेस पक्षाने बुधवारी आसामची राजधानी गुवाहाटी येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर निदर्शने केली. आसामचे काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. रावत आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी इमारतीत प्रवेश करण्यापासून रोखले. या वेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात चांगलीच चकमक उडाली.


दरम्यान, आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी आणि दुर्दशा यासाठी नोटाबंदीवर ठपका ठेवत दिल्ली काँग्रेसने नोटाबंदीच्या तिसऱ्या वर्षपूर्तीविरोधात ८ नोव्हेंबरला नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोपडा यांच्या नेतृत्वात चांदणी चौक संसदीय मतदारसंघातील १२ टूटी भागात या भागात हा मोर्चा काढण्यात येईल. यानिमित्त सर्व जिल्हा व मुख्य बाजारपेठांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चाचे आयोजन करतील. तसेच चोपडा यांच्याव्यतिरिक्त काँग्रेसचे इतर नेतेही या सभांना संबोधित करतील, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता मुकेश शर्मा यांनी सांगितले.


मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. देशात मोठी आर्थिक मंदी आहे आणि प्रत्येक चौथा नागरिक कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून केंद्र सरकार भांडवलदार आणि श्रीमंतांचे हित साधण्यासाठी धोरणे आखत असल्याचा आरोप सुभाष चोपडा यांनी केला. काँग्रेसच्या दबावामुळे प्रादेशिक संयुक्त आर्थिक करारावर मोदींनी सही केली नाही, असा दावा त्यांनी केला.


दिल्लीतील सुशिक्षित तरुणांचा उल्लेख करताना चोपडा म्हणाले की, वाढती बेरोजगारी हा केंद्र आणि दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. दिल्लीत हजारो शिक्षकांची पदे रिक्त आहेत, ती भरली जात नाहीत. कर्मचाऱ्यांची कपात होत आहे, तर दुसरीकडे दिल्ली सरकार किमान वेतन वाढवण्याचे नाटक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीतील नागरिकांना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना हल्लाबोल मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रवक्ता शर्मा यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...