आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्व हिरावले होते, लातूरच्या प्रचार सभेत पीएम मोदींचा घणाघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नागरिकत्व एकेकाळी काँग्रेसने हिरावून घेतले होते असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. लातूरच्या औसा येथे महायुतीच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच सभेला संबोधित करताना पीएम मोदींनी काँग्रेसवर चौफेर हल्ला चढवला. काँग्रेसची सत्ता असताना बाळासाहेबांचे नागरिकत्व कसे काढून घेण्यात आले होते याची आठवण करून देताना मोदींनी 1999 च्या प्रकरणाची आठवण करून दिली.


शरदराव तुम्ही तिकडे शोभत नाहीत -मोदी
जुलै 1999 च्या वादग्रस्त निवडणूक प्रचारात केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कारवाई केली होती. आयोगाने पुढील 6 वर्षे त्यांना मतदान करणे आणि निवडणुकीत थेट उतरण्यापासून मज्जाव केले होते. यानंतर बाळासाहेबांनी 2006 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. पीएम मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवताना पवार यांच्यावरही टीका केली. काँग्रेस त्यांचे सहकारी पक्ष देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे समर्थन करतात. काँग्रेसमुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्याच लोकांमध्ये राहतात. काँग्रेसकडून या देशाला काहीच अपेक्षा नाहीत. परंतु, शरद पवारांना असे शोभत नाही असे मोदी म्हणाले आहेत.