• Home
  • National
  • Congress candidate Ajay Ray will be stand against Modi in Varanasi

अखेर संभ्रम संपला : वाराणसीत प्रियंका नव्हे, अनामत गमावणारे अजय काँग्रेस उमेदवार

दिव्य मराठी

Apr 26,2019 08:49:00 AM IST

वाराणसी - वाराणसीमधून प्रियंका गांधी-वढेरा निवडणूक लढणार नाहीत. २०१४ मध्ये केवळ ७५ हजार मते मिळवून अनामत रक्कमही वाचवू न शकलेले अजय रायच उमेदवार असतील. सूत्रांनुसार, मतांचे गणित काँग्रेसच्या बाजूने नव्हते. यासोबत सोनिया गांधीही प्रियंकांना अमेठी व रायबरेलीपासून दूर ठेवू इच्छित आहेत.

झाशीत प्रियंका यांचा रोड शो
> महिलांची पुष्पवृष्टी, भांडणाऱ्या काँग्रेस गटांना दरडावले

प्रियंका यांनी गुरुवारी झांसीमध्ये रोड शो केला. ४ किमीचा रोड शो पावणेदोन तासांत पूर्ण झाला. महिलांनी छतावरून प्रियंका यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्या मंदिरातही गेल्या. रोड शोदरम्यान काही काँग्रेसचे गट आपापसात भिडले. हे पाहून प्रियंका गाडीतून उतरल्यावर दोन्ही गटांना रागावून समज दिली.


X