आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने अखेर चंद्रपूरचा उमेदवार बदलला; हिंगाेलीत सुभाष वानखेडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांच्या नाराजीची दखल घेत राहुल गांधी यांनी चंद्रपूरचा उमेदवार तडकाफडकी बदलला. विनायक बांगडे यांचे नाव वगळून त्या जागी चव्हाणांनी शिफारस केलेले सुरेश ऊर्फ बाळू धानाेरकर यांना तिकीट दिले. धानाेरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा नुकताच राजीनामा देत काँग्रेसमध्ये येण्याची तयारी केली हाेती. मात्र तरीही त्यांना तिकीट नाकारल्याने अशाेक चव्हाण नाराज झाले हाेते. आता त्यांची नाराजी दूर झाली. चंद्रपूरमध्ये  भाजपचे हंसराज अहिर यांच्याशी धानाेरकरांची लढत हाेईल.

 

सेनेचे माजी खासदार आता काँग्रेसच्या गाेटात दाखल
शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनाही काँग्रेसमध्ये घेऊन हिंगाेलीचे तिकीट  दिले. तसेच रामटेकमधून किशाेर गजभिये यांना व  अकाेला मतदारसंघातून हिदायत पटेल यांना काँग्रेसने पुन्हा संधी दिली आहे.

 

 

वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील यांचा काँग्रेस पक्षाला रामराम
वसंतदादा पाटील यांचे नातू व माजी खासदार प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठाेकला.  सांगलीची जागा राजू शेट्टींच्या पक्षाला साेडण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याच्या निषेधार्थ त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. 

 

भंडारा-गाेंदिया मतदारसंघातून भाजपने सुनील बाबूराव मेंढे यांना उमेदवारी जाहीर केली अाहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हा मतदारसंघ पुन्हा लढवण्याची शक्यता अाहे.

बातम्या आणखी आहेत...