आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Clears Rahul Gandhi Not Offered Resignation Letter In Cwc Meet After Lok Sabha Loss

राहुल गांधींनी अद्याप अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाच नाही; काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाची स्पष्टोक्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत सपशेल पराभूत ठरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिलेला नाही असे पक्षाने शनिवारी स्पष्टीकरण दिले. निवडणुकीत पराभवाची जबाबदारी घेत राहुल यांनी राजीनामा दिला. परंतु, काँग्रेसने तो स्वीकारलेला नाही असे समोर आले होते. परंतु, काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ह्या सर्वच चर्चा धुडकावून लावण्यात आल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या. 2014 मध्ये हा आकडा 44 होता.


काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी शनिवारी कार्यकारिणीची बैठक बोलावली. या बैठकीत यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चौकीदार चोर है कॅम्पेन चालवले. परंतु, हे कॅम्पेन कुचकामी ठरल्याचे निकालातून दिसून आले आहे. सोबतच, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रियंका सुद्धा उतरल्या होत्या. परंतु, पक्षाला त्याचा काहीही फायदा झाला नाही. एवढेच नव्हे, तर राहुल गांधींचा अमेठी येथील पारंपारिक जागा सुद्धा गमावली. ही जागा मतदारांनी भाजपच्या स्मृती इराणींच्या पदरात टाकली. देशभरातून भाजपला मतदारांनी दिलेल्या समर्थनानंतर भाजपला 300 हून अधिक जागा मिळाल्या. तसेच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.