आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची मध्यरात्रीतून यादी जाहीर , औरंगाबादेतून झांबड तर जालन्यातून औताडेंना उमेदवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता काँग्रेसने तर १.२० वाजता भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली. अाैरंगाबादमधून काँग्रेसने अामदार सुभाष झांबड, जालन्यातून विलास केशवराव अाैताडे, चंद्रपूरमधून विनायक बांगडे, भिवंडीतून सुरेश काशिनाथ तावरे तर लातूरमधून उद्याेजक मच्छिंद्र कामत कासराळकर (उदगीर) यांची नावे जाहीर केली. तर भाजपने जळगावातून स्मिता उदय वाघ, दिंडाेरीतून (जि. नाशिक) डाॅ. भारती पवार, पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट, साेलापुरातून जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, बारामतीतून रासपचे अामदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन अाणि सध्या शिवसेनेचे अामदार असलेले प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपने नांदेडमधून उमेदवारी जाहीर केली.

 


तत्पूर्वी, शिवसेनेने शुक्रवारी दुपारी तर भाजपने यापूर्वीची यादी गुरुवारी जाहीर केली. त्यात बहुतांश विद्यमान खासदारांना तिकिटे कायम ठेवली. भाजपमधून माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंृंगारे या नव्या चेहऱ्याला संधी दिली, तर शिवसेनेने उस्मानाबादमधून माजी अामदार अाेम राजेनिंबाळकर व हिंगाेलीतून नांदेडचे अामदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली.

 


राष्ट्रवादीनेही दाेन उमेदवारांची घाेषणा केली.   उस्मानाबादेतून राणा जगजित तर माढ्यातून साेलापूर जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली.

 

 

चंद्रकांत खैरे-झांबड चुरस रंगणार

गेली चार टर्म खासदार असलेले चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेने पुन्हा औरंगाबादेतून उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील अामदार सुभाष झांबड यांच्याशी त्यांची लढत हाेईल. वंचित बहुजन आघाडीने हा मतदारसंघ एमआयएमसाठी साेडला आहे. आमदार इम्तियाज जलील हे त्यांचे उमेदवार असू शकतात. गेली चार टर्म पराभवाची नामुष्की सहन करत असलेल्या काँग्रेसची ही जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले, मात्र ते सफल हाेऊ शकले नाहीत.

 

 

जालन्यातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बीडमधून प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कायम

जालन्यातून रावसाहेब दानवे यांची, तर बीडमधून डाॅ. प्रीतम मुंडे या खासदारांची उमेदवारी कायम राहिली. काँग्रेसने दानवेंविराेधात पुन्हा विलास औताडेंना रिंगणात उतरवले आहे. तर प्रीतम मुंडेंविराेधात बजरंग साेनवणे या नव्या चेहऱ्याला राष्ट्रवादीने मैदानात उतरवले अाहे. नांदेड, हिंगाेलीत काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी तिथे अनुक्रमे खासदार अशाेक चव्हाण, राजीव सातव यांचे नाव निश्चित मानले जाते.

 

 

या खासदारांचे तिकीट कापले
१. उस्मानाबाद : रवी गायकवाड (सेना) 
२. लातूर : सुनील गायकवाड (भाजप)
३. जळगाव : ए.टी. पाटील (भाजप)
४. पुणे : अनिल शिराेळे (भाजप)
५. साेलापूर : शरद बनसाेडे (भाजप)
६. दिंडाेरी : हरिश्चंद्र चव्हाण (भाजप)

बातम्या आणखी आहेत...