आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभागृहाबाहेर: काँग्रेसची निदर्शने, ‘कैसा है मोदी राज, महंगा राशन-महंगा प्याज ’; विरोधकांच्या घोषणा

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गुरुवारी लोकसभेत कांद्याच्या वाढत्या दरावरून गदाराेळ झाला. लोकसभेत काँग्रेसचे खासदार सुरेश म्हणाले, देशभरातील बाजारपेठेत कांदा प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांनी विकला जात आहे. मोठ्या शहरांत १३० रुपये दराने त्याची विक्री केली जात आहे, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पदरात मात्र एक किलो कांद्यासाठी ८ रुपये पडतात. या प्रचंड दरवाढीचा लाभ मात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. उलट हवामान बदल, कर्ज परत करण्यासाठी त्यांना बँकांच्या दबावाला तोंड द्यावे लागत आहे. बेमोसमी पाऊस व पुरामुळे आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील १३७ जिल्ह्यांना त्याचा फटका बसला, परंतु केंद्र सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही. केंद्राकडे पीक कर्जमाफीचा प्रस्ताव नाही. राष्ट्रीय गुन्हेविषय दस्तऐवजानुसार २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. त्यावरून दर महिन्याला सरासरी ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असे सुरेश यांनी सांगितले. ‘कैसा है मोदी राज, महंगा राशन-महंगा प्याज ’; विरोधकांच्या घोषणा
 
कांद्याच्या वाढत्या दराच्या विरोधात संसदेबाहेर काँग्रेसने निदर्शने केली. त्यात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरमही सहभागी झाले. त्यांनी तसेच इतर नेत्यांच्याही हाती फलक दिसून येत होते. त्यावर ‘ महंगाई की प्याज पर मार, चुप क्यों मोदी सरकार’ अशी विचारणा करणारे फलकही होते. काही खासदारांनी कांद्याची टोपलीही आणली होती. हे खासदार ‘कैसा है मोदी राज, महंगा राशन-महंगा प्याज’ अशा घोषणा देत होते. २५ रुपये किलोने उपलब्ध करून देतो : वीरेंद्र सिंह

लोकसभेत भाजप खासदार वीरेंद्र सिंह म्हणाले, विरोधी पक्षातील सदस्यांना हवे असल्यास २५ किलो दराने कांदा उपलब्ध करून देऊ शकतो. वीरेंद्र सिंह यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. महाराष्ट्र, गुजरातनंतर सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. सिंह उत्तर प्रदेशातील बलियाचे संसदेत प्रतिनिधित्व करतात. देश : महाराष्ट्राचा उत्पादनात ३५ टक्के वाटा


> महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व छत्तीसगडमध्ये कांद्याचे सर्वाधिक  उत्पादन होते. ही सर्व राज्ये मिळून ९० टक्के कांद्याचे उत्पादन होते. महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. महाराष्ट्राचा देशात ३५ टक्के वाटा आहे. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश (१५ टक्के) आहे. महाराष्ट्रात कांदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बाजारपेठेत येतो.
 


> महाराष्ट्रातील पाच मोठे उत्पादन मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यांत बेमोसमी पावसामुळे उत्पादन दर सरासरी ३० टक्के राहिले. कांद्याची गुणवत्ताही यंदा घटली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. , शेतकऱ्यांनी विलंबातील खरिपात कांदा लावला नाही. रब्बीतील कांद्यालाही फटका बसला. 
 

बातम्या आणखी आहेत...