आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमडळ विस्तार विलंबास काँग्रेस कारणीभूत नाहीच, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी तयार होत नाही, त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ विस्तारास विलंब होत आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी गुरुवारी खोेडून काढला. प्रशासनाला तयारीसाठी वेळ हवा होता, त्यामुळे सर्वानुमते मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचे, त्यांनी गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी स्पष्ट के़ले़.

१६ डिसेंबरपासून राज्य मंत्रिमंडळाचे हिवाळी अधिवेश नागपुरात सुरू झाले. २२ पर्यंत प्रशासन नागपुरात होते. शपथविधी समारंभाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतात, त्यांचे पास, शपथविधीचे नियोजनाच्या तयारीसाठी प्रशासनाला वेळ हवा होता. त्यामुळे डिसेंबरअखेर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय झाला होता, असे थोरात यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या यादीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याचे म्हटले होते.

शरद पवार यांच्याकडे महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल आहे, हा दावा थाेरात यांनी फेटाळला. आघाडीचे सरकार आहे, समान कार्यक्रमावर सरकार चालले आहे, कुणाच्याही हाती रिमोट नाही, असे थोरात यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री जाणार आहे, त्यामुळे काँग्रेसने गृहमंत्री पदावर दावा केला आहे, याला थोरात यांनी पुष्टी दिली.

मोदी सरकार सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस स्थापना दिनी शनिवार, २८ डिसेंबर रोजी मुबईतील ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी, असा भारत बचाओ संविधान बचाओ फ्लॅग मार्च काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
 

बातम्या आणखी आहेत...