आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Election Plan News In Marathi, Rahul Gandhi,

ANALYSIS: भाजपच्या बालेकिल्ल्यालाच खिंडार पाडण्याची कॉंग्रेसची रणनिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांबाबत भाजप निश्चिंत आहे. मध्य प्रदेशातील 29 पैकी भाजप सध्या 16, कॉंग्रेस 12 आणि बसपा 1 जागांवर आहे. याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये भाजपच्या खात्यात 10 आणि कॉंग्रेसजवळ 1 जागा आहे. राजस्थानमधील एकूण 25 जागांपैकी गेल्या वेळी कॉंग्रेसने 20 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपला 4 आणि अपक्षाला 1 जागेवर समाधान मानावे लागले होते.
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमला वाटते, की मध्य प्रदेशात 26-27, राजस्थानमध्ये 23-24 आणि छत्तीसगडमध्ये 9 ते 10 जागा सहज जिंकता येऊ शकतात.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेस लोकसभेच्या रणनितीची नव्याने तयारी करीत आहे. वरील तीन राज्यांमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवारांना तिकीट देऊन भाजपच्या निष्काळजीपणाचा लाभ उचलण्याच्या प्रयत्नात आहे. या राज्यांमधील प्रचार-प्रसारावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या निवडीवर कॉंग्रेस भर देणार आहे. या राज्यांमध्ये गमावण्यासारखे काही नाही. उलट भाजपला घेरून 10-12 जागांचा फरक करता आला तर नरेंद्र मोदींच्या वाटेत मोठे अडथळे येतील. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला यश मिळण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे या पक्षाने या तीन राज्यांवर फोकस ठेवला आहे.
मध्य प्रदेशात 10 जागांवर काट्याची टक्कर
मध्य प्रदेशचा विचार केला तर ग्वाल्हेर आणि छिंदवाडा या दोन जागांबाबत कॉंग्रेसला संशय नाही. देवासमध्ये सज्जनसिंह वर्मा, रतलाममध्ये भूरिया, मंदसौरमध्ये मीनाक्षी नटराजन, मुरैनामध्ये गोविंदसिंह, सतनामध्ये अजयसिंह आणि सिधीमध्ये इंद्रजीत पटेल या सहा जागा अशा आहेत जेथे कॉंग्रेसला मोठ्या आशा आहेत. या व्यतिरिक्त दोन मतदारसंघात असे उमेदवार दिले जातील जे नक्कीच निवडून येऊ शकतात. अशा प्रकारे कॉंग्रेस मध्य प्रदेशात 10 जागांवर काट्याची टक्कर देऊ शकते. मध्य प्रदेशातून 6-7 जागा जरी मिळाल्या तर भाजपच्या गणितात 4-5 जागांचे अंतर पडू शकते.
छत्तीसगडमध्ये 4 जागांवर जोरदार मुकाबला
छत्तीसगडमध्ये महासमुंद आणि कोरबा या दोन मतदारसंघात कॉंग्रेसला यश मिळण्याची शक्यता आहे. बिलासपूर येथून अटलजी यांची भाची करुणा शुक्ला आणि कांकेर येथून फूलोदेवी नेताम असे उमेदवार आहेत, ज्यांच्यावर कॉंग्रेसला पूर्ण विश्वास आहे. करुणा शुक्ला नुकत्याच भाजपला सोडून कॉंग्रेसच्या तंबूत दाखल झाल्या आहेत. एकूण चार जागांवर भाजपला जोरदार उत्तर देण्याच्या तयारीत कॉंग्रेस आहे. जर असे झाले तर भाजपच्या राजकीय गणितात 2-3 जागांचा फरक पडू शकतो.
राजस्थानमधील 10 जागांवर आर या पार
राजस्थानमध्ये कॉंग्रेसला अजमेर, अलवर आणि जयपूर ग्रामिण या जागांवर विजय मिळण्याचा विश्वास आहे. या व्यतिरिक्त झुंझुंनू येथून शीशराम ओला यांची सून राजबाला ओला, बांसवाडा येथून रेश्मा मालवीय, भिलवाडा येथून अशोक चांदना, चुरू येथून प्रताप पूनिया, जालौर येथून उदयलाल आंजना आणि टॉक येथून मो. अझररुद्दीन असे उमेदवार आहेत, ज्यांच्यावर कॉंग्रेसचा विश्वास आहे. एकूण आठ जागांवर जोरदार मुकाबला असल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस आणखी 2 तगडे उमेदवार निवडणुकीत उतरविण्याच्या विचारात आहे. जर पक्षाने 5-6 जागा जरी जिंकल्या तरी भाजपच्या गणितात 3-4 जागांचे अंतर पडू शकते.
एकूण सर्व परिस्थितीचा विचार केल्यास कॉंग्रेस आपल्या प्रचाराच्या बळावर भाजपच्या गणितात 10-12 जागांचा फरक करू शकते.