आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रफाल प्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी मुंबईत काँग्रेसचा मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माेदी सरकारने रफाल युद्धविमाने खरेदीत केलेल्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसने मुंबईत गुरुवारी मोर्चा काढला. महालक्ष्मी रेसकोर्स येथून सुरू झालेल्या मोर्चाची ऑगस्ट क्रांती मैदानावर सांगता झाली. 


प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, नसीम खान, हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, आमीन पटेल, सुनील केदार, बाबा सिद्दिकी, कृपाशंकर सिंह, सचिन सावंत आदी नेते मोर्चात सहभागी झाले होते. 


मोर्चाच्या समाप्तीनंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने राजभवन येथे काँग्रेस शिष्टमंडळाने राज्यपाल यांना निवेदन दिले. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचे मोर्चात भाषण झाले. रफाल विमान खरेदीतील ४१ हजार कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले, हिंदुस्थान एरोनॉटिक्स या सरकारी कंपनीला मिळणारे विमानाचे 'आॅफसेट काँट्रॅक्ट' अवघ्या १४ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या रिलायन्स उद्योग समूहाला का दिले, याची उत्तरे नरेंद्र मोदी सरकारने द्यावीत, अशी मागणी खर्गे यांनी केली. 

बातम्या आणखी आहेत...