आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना जोरदार धक्का, काँग्रेस प्रदेश सरचिटणीसांनी सहकुटुंब घेतला भाजप प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि परळीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टीपी मुंडे यांनी भाजपला जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. टीपी मुंडे हे भाजपचे जेष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पट्टीतील नेते आहेत. टीपी मुंडे यांचा एक मुलगा प्रदीप मुंडे जिल्हा परिषद सदस्य, दुसरा मुलगा नगरसेवक आणि मुलगी युवा काँग्रेसच्या नेत्या आहेत, त्यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच, भाजपातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच टीपी मुंडे यांचाही भाजप प्रवेश होणार आहे. 

परळी तालुका काँग्रेसचे विसर्जन करुन पंकजा मुंडेंनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे टी.पी. मुंडे यांनी यावेळी सांगितले. टी.पी. मुंडेंनी भाजपमध्ये प्रवेश करताना धनंजय मुंडे यांच्यावर कडाडून टीका केली. धनंजय मुंडेंमुळे भाजप सोडले होते. आता त्यांनी केलेल्या अन्यायामुळे काँग्रेस सोडत असल्याचे ते म्हणाले. वारंवार डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत बोलून दाखवली. तसेच, गुंडगिरी आणि दबावाला बळी पडू नका, जशास तसे उत्तर देणार आहे. पंकजा महाराष्ट्राची वाघिण आहे. मुंडे घराण्याची खरी शान आहे. त्यांच्या जादूचा कांडीचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे.


तसेच, येत्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना निवडून देण्यासाठी सर्व यंत्रणा उभी करणार असल्याचे सांगितले. तसेच पंकजा माझी मुलगीच आहे. तिच्या पाठीशी चुलता म्हणून खंबीरपणे उभा राहील असे सांगितले. यामुळे परळी विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडेंचे पारडे जड झाले आहे. तसेच काका आल्याने विजय कोणी रोखणार नाही, मी राज्य सांभाळायला मोकळी आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.


टी.पी.मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात 1999 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 45 हजार मते मिळाले होते. 2009 ला त्यांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 65 हजार मते मिळाले होते. 2014 ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढले होते. त्यावेळी 20 हजार मत घेतली होती. नगर पालिका, बाजार समिती जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहेत. यामुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का समजला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...