Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Congress in-charge Mallikarjun Kharge's criticism on government

कट्टरवाद्यांना सरकारचे बळ; काँग्रेसचा एकतेसाठी लढा

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 07:36 AM IST

‘केंद्र व राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ देत आहे. त्यांचे हे धोरण निषेधार्ह अाहे.

 • Congress in-charge Mallikarjun Kharge's criticism on government

  काेल्हापूर- ‘केंद्र व राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांना पाठबळ देत आहे. त्यांचे हे धोरण निषेधार्ह अाहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशात एकता कायम ठेवण्यासाठी लढाई लढते आहे. त्याचाच एक भाग म्हणून अाम्ही काेल्हापुरातून संघर्ष यात्रा काढत असून ही यात्रा केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही तर ही तत्त्वांची लढाई आहे,’ असे काँग्रेसचे महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी सांगितले. महाराष्ट्राला सनातनची नव्हे तर फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा हवी असल्याचेही त्यांनी सांगितले.


  काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचा प्रारंभ शुक्रवारी काेल्हापुरात झाला. सकाळी महालक्ष्मी मंदिरात जाऊन काँग्रेसच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी आशीर्वाद घेतला. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी जनसंघर्ष ज्योत प्रज्वलित करून ती मल्लिकार्जुन खरगे व अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवली. दरम्यान, यात्रेतील नेत्यांनी मराठा व लिंगायत समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांना भेट त्यांना पाठिंबा दिला. नंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खरगे यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. तेे म्हणाले, ‘अाजवर कोणत्याही पंतप्रधानांनी जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावण्याचे उद्योग केले नाहीत. परंतु, मोदी सरकारच्या काळात देशातील वातावरण कलुषित केले जात आहे. मोदींनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत.’


  प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण म्हणाले, भाजप-शिवसेनेने महाराष्ट्राचा अपेक्षाभंग केला आहे. निवडणुकीच्या काळात दाखवलेले स्वप्न आणि आज राज्याची झालेली दुर्दशा पाहता ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’ असे विचारण्याची वेळ आली आहे. सरकारविरुद्ध राज्यात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत सत्तापरिवर्तन अटळ आहे. हे सरकार केवळ घोषणाबाज सरकार आहे. पण केलेल्या घोषणा पूर्ण करायला या सरकारकडे पैसाच शिल्लक नाही. म्हणूनच सतत दरवाढ, करवाढ करून जनतेवर नाहक आर्थिक बोजा लादला जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘निवडणूक प्रचारात भाजपने भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आश्वासन दिले होते. नरेंद्र मोदी यांनी तर ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ अशी वल्गना केली होती. पण प्रत्यक्षात सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. भ्रष्टाचार दडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून सातत्याने लोकविरोधी निर्णय घेतले जात आहेत. त्याचा अतिशय प्रतिकूल परिणाम होत असताना सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही. या सर्व बाबींचा जनसंघर्ष यात्रेत समाचार घेतला जाईल,’ असेही ते म्हणाले.


  आंबेडकरांचा फाेटाे लावणेही देशद्रोह : विखे
  भाजप-शिवसेनेच्या राजवटीत घरात फुले-शाहू-आंबेडकरांची तसबीर लावणेही देशद्रोह ठरत असल्याचा अाराेप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंत आणि साहित्यिकांवर कारवाई हाेत अाहे. हैदराबाद येथील कवी वरावरा राव यांच्या मुलींच्या घराची झडती घेताना पोलिसांनी त्यांना हिंदू असताना घरी देवी-देवतांऐवजी फुले-आंबेडकरांच्या तसबिरी का लावता?’ असा संतापजनक सवाल केल्याचे विखे म्हणाले.

Trending