Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Congress is donkeys party : Adv Prakash Ambedkar

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष, असा गाढवपणा करणारच : अॅड. आंबेडकर यांची टीका

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 10:16 AM IST

सुशीलकुमार शिंदे यांनी घेतलेल्या भेटीवर अॅड. आंबेडकर यांची टीका

  • Congress is donkeys party : Adv Prakash Ambedkar


    सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांनी घेतलेली भेट वेगळ्याच वळणावर गेली. त्यांच्या भेटीचे छायाचित्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला अन् नसत्या चर्चांना उधाण आले. त्यावर संतापून अॅड. आंबेडकर म्हणाले, “काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. भेटीच्या फोटोबद्दल असा गाढवपणा होईल, असं मला वाटलंच होतं. भेटीचे राजकारण करणे काँग्रेसवाल्यांना चांगलेच जमते.’

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात अाले होते. त्या वेळी माध्यमांसमोर ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, “राजकारणात भेटी-गाठी होत असतात. त्याबद्दल दुमत नाही. परंतु या भेटीचेही राजकारण करणे चुकीचे असते. त्याला काँग्रेसवाले डावपेच म्हणतात. कुठून तरी भेट घ्यायची. त्याचे छायाचित्र काढून घ्यायचे आणि मग ते चहूकडे व्हायरल करून टाकायचे. त्यानंतर शेवटी म्हणायचे, ‘अरेरे, हे असं झालं, ते तसं झालं. काँग्रेसचे हे घाणेरडे राजकारण आहे. निवडणुकीत शेवटी लोकच ठरवणारे असतात. अशा घाणेरड्या राजकारणाला लोकच धडा शिकवतील.’, असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.

    नेमके घडले काय?
    शनिवारी सकाळी अॅड. प्रकाश आंबेडकर सोलापुरातील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये नाश्ता करत होते. त्यावेळी सुशीलकुमार शिंंदे त्यांना भेटायला गेले. या भेटीचे छायाचित्र लागलीच विविध समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले. त्यामुळे लोकांमध्ये वेगळीच चर्चा सुरू झाली. याबाबत विचारले असता, अॅड. आंबेडकर यांच्या मनातील काँग्रेसबद्दलचा संताप बाहेर पडला.

Trending