आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रकांत पाटलांच्या गुगलीने काँग्रेस अस्वस्थ; एकजूट राखण्याचे आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या ५ नव्या कार्याध्यक्षांपैकी १ लवकरच भाजपमध्ये आला तर आश्चर्य वाटू नये, असे वक्तव्य बुधवारी केले. हा ‘कार्याध्यक्ष’ नेमका काेण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या पक्षत्यागाने धक्का बसलेल्या कांॅग्रेसमध्येही पाटलांच्या वक्तव्याने अस्वस्थता पसरली आहे. 

 

गुुरुवारी प्रदेश कांॅग्रेसची बैठक हाेती, तिथेही याच विषयावर कुजबूज सुरू हाेती. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मात्र चंद्रकांतदादांचा हा दावा खाेडून कााढत सर्वांनी एकत्रित राहावे, असे आवाहन केले. दरम्यान, माझे वडील शेवटपर्यंत कांॅग्रेसमध्येच राहिले, मीही पक्ष साेडणार नाही, असे स्पष्टीकरण कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी दिले. 

 

गुरुवारी सकाळी बाळासाहेब थोरात आणि नव्या पाच कार्याध्यक्षांनी टिळक भवन येथे कार्यभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच यशवंतराव चव्हाण केंद्रात काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदेही उपस्थित होते.

 

या वेळी खर्गे यांनी अशोक चव्हाण यांची प्रशंसा करत त्यांनी चांगले काम केले असे सांगितले. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. ही लढाई फक्त निवडणुकीपुरती नसून देशाची लोकशाही व संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आहे. ही लढाई काँग्रेस पक्ष जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


‘आता मतभेद विसरून पुढे जावे लागेल. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागेल. जे बाहेर गेले आहेत त्यांना परत आणण्याचे काम करूया,’ असे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी केले. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारचे वाभाडे काढण्यास आपण कमी पडलो, अशी कबुली दिली.

 

जुने गेल्याने नव्यांना संधी
थोरात यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या. ‘काँग्रेसमध्ये अशी संकटे पचवण्याची ताकद असून यातून बाहेर पडून राज्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल. त्यासाठी आता गट तट, मतभेद विसरून कामाला लागले पाहिजे.जुने लाेक पक्षातून गेल्याने नव्यांना संधी मिळत आहे. त्यामुळे नवीन तरुण व महिलांना संधी देईल जाईल. लोकांना भेटा आणि घरात ठेवलेले बिल्ले बाहेर काढा.