आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress Issues Adjournment Notice In The Lok Sabha On Maharashtra Politics Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद संसदेत; काँग्रेसची घोषणाबाजी, लोकशाहीची हत्या झाली -राहुल गांधी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ
  • सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस खासदारांची संसद परिसरात निदर्शने

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील राजकारणाच्या मुद्द्यावर जोरदार गोंधळ उडाला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी या राजकारणाचा निषेध केला. लोकसभेत प्रश्नकाल सुरू असताना काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजी केली. यात 'संविधानाची हत्या बंद करा' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राहुल गांधी म्हणाले, मी सभागृहाला विचारू इच्छितो. परंतु, महाराष्ट्रात आधीच लोकशाहीची कत्तल झालेलील आहे त्यामुळे विचारण्यातही काहीच अर्थ राहिलेला नाही. विरोधकांच्या घोषणाबाजी आणि गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज स्थगित करावी लागले. यानंतर काँग्रेस खासदारांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसद परिसरात निदर्शने केली.
 
काँग्रेस, माकप आणि इतर विरोधी पक्षांनी दोन्ही सभागृहांमध्ये महाराष्ट्राच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करण्यात आली. लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि के सुरेश यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर स्थगन प्रस्ताव मांडला. तर माकपसह इतर विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावर राज्यसभेतील कामकाज निलंबित करण्याची मागणी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी सहावा दिवस आहे. केंद्र सरकार यामध्ये महत्वाचे विधेयक मांडणे अपेक्षित आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण लोकसभेत आयकर अधिनियम कायदा 1961 मध्ये सुधारणाचे विधेयक मांडणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन ई-सिगारेटवर प्रतिबंध संदर्भात विधेयक मांडणार आहेत.