आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस जनसंघर्ष यात्रेला राज बब्बर,मल्लिकार्जुन खरगे येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लाेड -  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भाजप सरकारविराेधात सुरू  जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. या जनसंघर्ष यात्रेचे सिल्लाेड येथे आगमन हाेत असून दुष्काळ  जाहीर करण्याच्या मागणीसाठी आयोजित  जाहीर सभेस काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.   


सिल्लोड येथे मंगळवारी (दि. ३०)  होणाऱ्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित  सभेला उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण, विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थाेरात  आदी उपस्थित राहणार आहेत. याबाबत माहिती देताना  आमदार सत्तार म्हणाले, भाजप सरकारने जनतेची दिशाभूल करून राज्य ताब्यात घेतले. खाेटी आश्वासने दिली. जनतेने भाजपवर विश्वास दाखवत भाजपला सत्तेवर बसवले. मात्र दिलेली आश्वासन सरकारने पाळली नाहीत. कर्जमाफी केली नाही. खात्यात पैसे टाकले नाहीत.

 

 दुष्काळात शेतकरी, शेतमजूर यांना वाऱ्यावर सोडले जात आहे.    महागाई, बेराेजगारी, भष्टाचार, अन्याय, अत्याचार वाढले आहेत. जनसामान्यांसाेबतच सर्वांनाच भाजप सरकारच्या कारभाराविराेधात चीड निर्माण झाली अाहे. हतबल झालेल्या जनसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढली आहे. जनसंघर्ष यात्रा शेवटच्या टप्प्यात  अाहे.  मंगळवारी (दि. ३०) होणाऱ्या सभेस  माेठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.  

 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची उद्या फुलंब्रीत सभा   

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने उद्या, मंगळवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजता फुलंब्री शहरातील पानवाडी रोडवर काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.  या सभेला जिल्ह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांनी या सभेला लाखोच्या संख्येने हजर राहावे, असे आवाहन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा माजी आ. डॉ. कल्याण काळे, फुलंब्री तालुकाध्यक्ष संदीप बोरसे व औरंगाबाद तालुकाध्यक्ष रामराव शेळके यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...