आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress & Jds Mla Resign In Karnataka Govt, Siddaramaiah Say It Is Operation Kamala

सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी देऊ शकतात, मल्लिकार्जुन खरगे होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळरू(कर्नाटक)- 13 महीन्यांच्या आघाडी सरकारला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ शकतात. असे मानले जात आहे की, काँग्रेस-जेडीएसच्या 12 आमदारांच्या राजीनाम्यानतर आलेल्या राजकिय अस्थिरतेला थांबवण्यासाठी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना आघाडी सरकारमध्ये नवे मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते. दुसरीकडे, भाजपने काँग्रेस-जेडीएस आमदारांच्या राजीनाम्याला काँग्रेसचा ड्रामा असल्याचे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेस लालची सिद्धारमैया यांना मुख्यमंत्री करण्यासाठी हा ड्रामा रचत आहे.

 

न्यूज एजंसीने काँग्रेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितले की, जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एचडी देवगौडा यांनी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी हा पर्याच दिला आहे की, आघाडी सरकारला वाचवण्यासाठी ते मल्लिकार्जुन खरगे यांना मुख्यमंत्री करावे.


'खरगे यांना समर्थन देण्यासाठी जेडीएस तयार'

काँग्रेस-जेडीएस आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर देवगौडांनी शनिवारी रात्री सोनिया गांधी सोबत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी खरगेंना समर्थन देण्यावर चर्चा केली. सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधींनी रात्री पक्षाच्या कोर समितीची बैठक बोलवली आणि यात गौडांच्या पर्यायावर विचार केला. बैठकीत खरगेंना कर्नाटकला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला.


काँग्रेस-जेडीएस आघाडी अपवित्र- भाजपा
केंद्रीय मंत्री जोशी म्हणाले, ही अपवित्र आघाडी आहे. काँग्रेस कुमारस्वामीला मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी हे करत आहे. तर आमदारांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात असल्याच्या आरोपावर म्हटले की, काँग्रेसकडे आता नेता नाहीये, त्यामुले ते असं करत आहेत. 


काँग्रेस-जेडीएसच्या 12 आमदारांचा राजीनामा
कर्नाटकातील 13 महिन्यांपूर्वीचे काँग्रेस-जनता दल सेक्युलर (जेडीएस) आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दोन्ही पक्षांच्या 12 आमदारांनी शनिवारी विधानसभा सभापतींच्या कार्यालयात जाऊन राजीनामे दिले. राजीनाम्यानंतर आमदारांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन राजीनामे दिल्याचे सांगितले. दरम्यान, या आमदारांना एका विशेष चार्टर्ड विमानाने मुंबईमार्गे गोव्याला नेण्यात आले असून रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. राजीनामा देणाऱ्या काँग्रेस आमदारांपैकी एक बी. सी. पाटील यांनी याला पुष्टी दिली. काही माध्यमांनी आमदारांना मुंबईत नेण्यात आल्याचे म्हटले होते. परंतु, भाजप आमदार सी. एन. अश्वत्थ नारायण यांनी या बातम्यांचे खंडन केले.


राजीनामा देणारे जेडीएस आमदार ए. एच. विश्वनाथ यांनी सांगितले, आनंदसिंहसह काँग्रेस व जेडीएसच्या 12 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. कुमारस्वामी यांच्यावर कुचकामी असल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी आमदारांनी राजीनामे दिले असल्याचे सांगून मंगळवारी याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले. या 12 आमदारांच्या राजीनाम्यामुळे एच. डी. कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले असून काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र सरकारला धोका नसल्याचे म्हटले आहे. या घडामोडी पाहता अमेरिका दौऱ्यावर असलेले कुमारस्वामी दौरा अर्धवट सोडून परतत असून काँग्रेसने भाजपवर आमदार खरेदीचा आरोप केला आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी के. सी. वेणुगोपाल सायंकाळी केरळहून बंगळुरूला परतले आणि त्यांनी काँग्रेस आमदारांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत.


सरकार स्थापण्याची तयारी : भाजप
सदानंद गौडा यांनी राज्यपालांनी भाजपला पाचारण केले तर सरकार स्थापन करण्याची पक्षाची तयारी असल्याचे म्हटले आहे. असे घडलेच तर येदियुरप्पा मुख्यमंत्री असतील.


आम्ही सदस्य नोंदणीत व्यग्र
आमदारांच्या राजीनाम्याशी भाजपचा काही संबंध नाही. आम्ही सध्या सदस्य नोंदणी अभियानात व्यग्र असून घटनाक्रमावर नजर ठेवून आहोत. वेळ येईल तेव्हा निर्णय घेऊ. 
- बी. एस. येदियुरप्पा, विरोधी पक्षनेते, भाजपचे प्रदेश अध्यक्ष

 

विधानसभेतील पक्षीय बलाबल
एकूण : 225
बहुमत : 113
काँग्रेस : 79 (सभापतींसह)
जेडीएस : 37
भाजप : 105
(यात राजीनामे देणाऱ्या आमदारांचाही समावेश)