आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Leader Abhishek Manu Singhvi Says Always Said Demonising PM Modi Is Wrong

नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्याने आपले नुकसानच अधिक; चांगल्या कामाचा गौरवही व्हायला हवा : काँग्रेस नेत्यांचा सल्ला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करणे काँग्रेसला महागडे ठरत आहे? या मुद्द्यावर चर्चा करण्याचे कारण म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेतेच आता जाहीरपणे हे मान्य करत आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना खलनायक ठरवणे सर्वस्वी चुकीच आहे. या विरोधातून एक प्रकारे विरोधी पक्ष मोदींची मदतच करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्यानंतर शुक्रवारी अभिषेक मनू सिंघवी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदी यांना खलनायक ठरवणे चुकीचे आहे. विरोधी पक्षाने सध्या केवळ मोदींना विरोध करायचा एवढेच धोरण ठेवले आहे. याचा खरे तर पंतप्रधानांनाच लाभ होत आहे. एखाद्या व्यक्तीचे काम चांगले, वाईट किंवा वेगळे असू शकते. याचा व्यक्ती म्हणून नव्हे, तर मुद्द्याच्या आधारे विचार व्हायला हवा. उज्ज्वला योजना त्यांच्या काही चांगल्या कामांपैकी एक आहे.’ यापूर्वी जयराम यांनी म्हटले होते की, “मोदींना सतत खलनायक ठरवत राहिलोत तर त्यांना प्रत्युत्तर देण्याचे धाडस आपल्यात येणार नाही. मोदी बोलताना अशी भाषा वापरतात की लोक आपोआप जोडले जातात.’  वास्तविक लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. कलम ३७० असो, चिदंबरम यांची अटक असो किंवा काँग्रेस अध्यक्षाची निवड असो, यात पक्षाची भूमिका एक नव्हती. या संभ्रमावस्थेमुळे अशा सर्व प्रकरणात पक्षाच्या भूमकेत भेद असल्याचे स्पष्ट झाले. या संभ्रमावस्थेने पक्षाची प्रतिमाही बिघडली. काँग्रेसचे बहुतांश नेते हे मान्य करतात की, थेट मोदींवर हल्ला करण्याचे धोरण अपयशी ठरले असूनही पक्ष याच भूमिकेवर कायम आहे. 

अशी वक्तव्ये नेत्यांची पकड सैल असल्याचे दाखवतात
काँग्रेसच्या एका सरचिटणीसांनीही हे मान्य केले की, गेल्या दोन दशकांत अशी वक्तव्ये प्रथमच जाहीरपणे होत आहेत. हे नेत्याची पकड ढिली असल्याचे संकेत आहेत. निवडणूक काळात माध्यमांत झळकण्यासाठी प्रत्येक मुद्द्यावर मोदींना जबाबदार ठरवण्याचे दुष्परिणाम आज आपण भोगले आहेत.

बातम्या आणखी आहेत...