आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम कदमांची जीभ कापल्‍यास 5 लाख रूपये, काँग्रेस नेत्‍याने केली घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दहीहंडी उत्‍सवात महिलांबद्दल वादग्रस्‍त टिप्‍पणी केल्‍यामुळे वादात सापडलेले राम कदम यांची जीभ कापल्‍यास 5 लाख रूपये देण्‍याची घोषणा राज्‍याचे माजी मंत्री व काँग्रेस नेते सुबोध सावजी यांनी केली आहे. 'तुम्हाला एखादी मुलगी आवडते. पण ती तुम्‍हाला नाही म्‍हणतेय, तर मला सांगा, तिला पळवून आणून तुमच्या ताब्यात देतो', असे वक्तव्य राम कदम यांनी केले होते. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍यावर चहुबाजूकडून टीका केली जात आहे. नंतर सारवासारव करत राम कदम यांनी ट्विटरवरून माफीही मागितली होती. 

 

व्हिडिओ जारी करून केली घोषणा

काँग्रेस नेता सुबोध सावजी यांनी एक व्हिडिओ जारी करून ही घोषणा केली आहे. यात त्‍यांनी म्‍हटले आहे की, 'राम कदम हे एक लोकप्रतिनिधी आहेत. त्‍यांना आपल्‍या जबाबदारीचे भान असायला हवे. लोकप्रतिनिधीने अशाप्रकारचे वक्‍तव्‍य करणे हे अशोभनिय आहे. त्‍यामुळे मी महाराष्‍ट्राच्‍या जनतेला आवाहन करत आहे की, जो कोणी राम कदमांची जीभ कापेल त्‍याला मी 5 लाख रूपये देईल.' बुलडाण्‍यात एका कार्यक्रमादरम्‍यान त्‍यांनी ही घोषणा केली आहे. 

 

हा विषय आता संपला- चंद्रकांत पाटलांनी केली पाठराखण
माध्‍यमांनी हा विषय उचलून धरल्‍यानंतर भाजपने अखेर या प्रकरणी आपले मौन सोडले आहे. राज्‍याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कदम यांची पाठराखण करताना हा विषय आता संपवला पाहिजे, असे म्‍हटले आहे. 'राम कदम यांची कारकिर्द मोठी आहे. त्‍यांच्‍या मतदारसंघात हजारो महिला त्‍यांना राखी बांधतात. त्‍यांनी अनेक महिलांना मदत केली आहे. तसेच या वक्‍तव्‍याबद्दल त्‍यांनी माफिही मागितली आहे. त्‍यामुळे हा विषय आता संपला', असे चंद्रकांत पाटील यांनी म्‍हटले आहे.  


भाजपचे कारवाईचे संकेत 
भाजपच्‍या पक्षसूत्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार, हे प्रकरण लवकर शांत झाले नाही तर पक्ष राम कदम विरोधात कारवाई करण्‍याची शक्‍यता आहे. राम कदम यांच्‍यावर पक्ष कारवाई करणार का? यावर चंद्रकांत पाटील म्‍हणाले आहेत की, राम कदम हे पक्ष प्रवक्ते पदावर राहणार की नाही यासंबंधीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच घेतील. 


    

 

बातम्या आणखी आहेत...