• Home
  • National
  • Congress leader DK Shivakumar gets into trouble, on ED's remand till September 13

National / काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ, 13 सप्टेंबरपर्यंत ईडीच्या रिमांडवर

हे सुड बुद्धीचे राजकारण- राहुल गांधी

Sep 04,2019 09:29:00 PM IST

नवी दिल्ली- दिल्लीच्या रोज एव्हेन्यू कोर्टाने आज(बुधवार) काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना 9 दिवसांसाठी ईडीच्या ताब्यात पाठवले आहे. शिवकुमार यांना मनी लॉन्ड्रिंग प्रिवेंशन अॅक्ट(एमएलपीए)अंतर्गत मंगळवारी अटक करण्यात आले. राम मनोहर लोहिया हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय चाचणीनंतर आज त्यांना विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांच्यासमोर सादर करण्यात आले. ईडीने याचिकेत म्हटले की, शिवकुमार चौकशीत मदत करत नाहीयेत, त्यामुळे त्यांना 14 दिवसांसाठी रिमांडमध्ये पाठवले जावे. पण कोर्टाने ही मागणी अमान्य करुन त्यांना 9 दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे.


हे सुड बुद्धीचे राजकारण- राहुल गांधी
त्यांच्या अटक होण्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी ट्वीट केले. ते म्हणाले,"शिवकुमार यांना अटक करुन सरकारने सुड बुद्धीचे राजकारण केले आहे. ते ईडी/सीबीआय आणि दुसऱ्या सरकारी संस्थांचा उपयोग करुन काही ठराविक व्यक्तींवर निशाना साधत आहेत.


ईडीच्या चौकशीत सहयोग करत नसल्याने मागितली रिमांड
ईडीकडून बाजू मांडणारे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल(एएसजी) केएम नटराज यांनी न्यायालयाला सांगितले की, इनकम टॅक्सच्या छाप्यात या गोष्टींचे पुरावे मिळाले आहेत की, डीके शिवकुमार मनी लॉन्ड्रिंगशी निगडीत प्रकरणात सामील होते. याप्रकरणाच्या तपासासाठी शिवकुमार यांची रिमांड गरजेची आहे.

X