National / काँग्रेसचे संकटमोचक ईडीच्या जाळ्यात, डीके शिवकुमार यांना पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून अटक

काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळख

दिव्य मराठी वेब

Sep 03,2019 08:30:00 PM IST

नवी दिल्ली- काँग्रेसचे कर्नाटकातील मोठे नेते डीके शिवकुमार यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पैशांची गैरव्यवहारप्रकरणी गेल्या चार दिवसांपासून त्यांची चौकशी सुरू होती. अखेर चौथ्या दिवशी ईडीने त्यांना अटक केली. कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार आणि कर चुकवणे याप्रकरणी आयकर विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारावर ईडीने पैशांची गैरव्यवहार केल्याचा आरोपात शिवकुमार यांना अटक केले आहे.


शिवकुमार यांची पीएमएलए कायद्यांतर्गत शुक्रवारी 4 तास आणि शनिवारी 8 तास चौकशी करण्यात आली होती. विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशीही चौकशीला बोलावण्याने शिवकुमार यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपण कायद्याचा आदर करत असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचे शिवकुमार म्हणाले होते. ईडीने समन्स दिल्याच्या विरोधात शिवकुमार यांनी कर्नाटक हायकोर्टातही धाव घेतली. पण कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर व्हावे लागले. आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नाही, असे त्यांनी अनेकदा सांगितले आहे.


शिवकुमार काँग्रेसचे संकटमोचक
डीके शिवकुमार हे काँग्रेसमधील कर्नाटकचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. 2017 मध्ये जेव्हा गुजरातच्या राज्यसभेसाठी निवडणूक होणार होती, तेव्हा काँग्रेसचे आमदार फुटण्याची वेळ आली होती. त्यावेळी गुजरातमधील काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी डीके शिवकुमार यांनी घेतली आणि त्यांना कर्नाटकातील एका रिसॉर्टमध्ये आणून ठेवले. आणि नंतर ही जागा काँग्रेसला जिंकून दिली.

X
COMMENT