आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या कार्यकाळात सर्वाधिक सैनिक शहीद, काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले. काँग्रेसपुढे असे अनेक आदर्श आहेत. मात्र, इतर पक्षांत अशा प्रकारे कोणी आदर्श नाही आणि त्यांच्यातील कोणीही देशासाठी कधी तुरुंगात गेले नाही.

 

जेवढे काम यूपीए एक आणि दोन सरकारच्या काळात झाले तेवढे आताच्या सरकार काळात  झालेले नाही. यूपीए सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद नष्ट केला. मात्र, भाजपने काश्मिरात पुन्हा दहशतवाद आणला आहे. भाजपच्या काळात काश्मीरमध्ये सर्वाधिक सैनिक शहीद झाले तसेच अनेक नागरिकही मारले गेल्याचा आरोप राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पुण्यात केला.  

 
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा  समारोप पुण्यातील एसएसपीएमएस मैदान येथे  जाहीर सभेने झाला. या वेळी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.  
खरगे म्हणाले, मोदी सत्तेत आल्यावर काहीतरी करतील अशी अपेक्षा लोकांना होती. मात्र, त्यांनी कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही. देशाची आर्थिक स्थिती खराब केली असून पेट्रोल आणि डिझेलचे दर सरकार दिवसेंदिवस वाढवत आहे. चुकीची धोरणे देऊन मोदी सरकार देशाला बरबादीकडे नेत आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या, चौकसी कर्जे घेऊन देशाबाहेर पळून गेले. मात्र, सरकार काही करत नाही. जे लोक संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय संपवण्याचे काम करत आहेत त्यांना जनतेने धडा शिकवला पाहिजे.

 
महाराष्ट्र खड्ड्यात : चव्हाण  
अशोक चव्हाण म्हणाले, स्मार्ट सिटी असलेल्या पुण्यात वाहतूक कोंडी, रस्त्यावर खड्डे, सर्वत्र कचऱ्याचे ढीग आहेत. देशात शेतकऱ्यांच्या ४५ हजार आत्महत्या, तर राज्यात १५ हजार आत्महत्या झाल्या आहेत.  फडणवीस यांनी महाराष्ट्र खड्ड्यात घातल्याचा आरोपही चव्हाण यांनी या वेळी बोलताना केला.

बातम्या आणखी आहेत...