MahaElection / काँग्रेसला खिंडार; माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील उद्या करणार भाजपात प्रवेश

इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून लढण्याची शक्यता

दिव्य मराठी वेब

Sep 10,2019 07:11:07 PM IST

पुणे - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याती माजी सहकार मंत्री उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील उद्या कमळ हाती घेणार आहेत. हर्षवर्धन भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.


हर्षवर्धन पाटील यांनी 4 सप्टेंबरला जलसंकल्प मेळावा घेतला होता. यावेऴी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करावा आणि विधानसभा लढवावी असे समर्थकांचे म्हणणे होते. अखेर उद्या हर्षवर्धन पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.


इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील हे नाराज होते. इंदापूरच्या गाजलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशाची मागणी केली होती. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


X
COMMENT