आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'...त्यापेक्षा गोडसेलाच भारतरत्न का देत नाहीत?', काँग्रेसचे नेते मनीष तिवारींचा उद्विग्न सवाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही भारतरत्न पुरस्कार देण्याचे भाजपने संकल्पपत्रात जाहीर केले आहे. त्यापेक्षा नथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही?’ असा उद्विग्न सवाल काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

गांधीजींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा सावरकरांवर आरोप होता. गांधी हत्येतील ते संशयित आरोपी होते. पण, गाेडसेने थेट गांधींना संपवलेच. हे गांधीजींचे १५०वे जयंती वर्ष आहे. गाेडसेला भारतरत्न देण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ सापडणार नाही. तेव्हा भाजप सरकारने गाेडसेलाच भारतरत्न देऊन टाकावे, असा उपराेधिक सल्लाही तिवारींनी माेदी सरकारला दिला. २००४ मध्ये काँग्रेसला १८२ जागा मिळाल्या तर २००९ मध्ये २०६ जागा आल्या. मात्र २०१४ मध्ये लोकांनी आम्हाला घरी बसवले. . एका ठरावीक कालावधीनंतर लाेक प्रत्येकालाच थांबायला सांगतात. हा काँग्रेससाठी नक्कीच आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतनाचा विषय आहे, असे तिवारी म्हणाले.
 
 

 

सोनियांच्या नेतृत्वावर...
काँग्रेसमध्ये नेतृत्व लकवा कधीच नव्हता. पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी याच सक्षम नेत्या होत्या, अशा शब्दांत तिवारींनी नेतृत्व निर्णयाचे समर्थन केले.  भाजपवाले राष्ट्रवादाच्या गोष्टी करीत आहेत. पण, राष्ट्रवादाने पोट भरत नाही, अशी टीका तिवारी यांनी केली.
 
 

बातम्या आणखी आहेत...