आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला; शक्तीप्रदर्शनादरम्यान विद्युत पोल कोसळला, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून यावेळी शहरातून मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदेही यावेळी उपस्थित आहेत. तत्पूर्वी, चार हुतात्मा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते याचबरोबर शिंदे समर्थक तसेच काँग्रेसचे सर्व विभागांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

 

विद्युत पोल कोसळला, सुदैवाने मोठा अनर्थ टळला..

सुशीलकुमार शिंदे यांच्या स्वागतासाठी आणि निवडणुकीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी शिस्तीचे पालन केले नाही. प्रचंड गर्दी आणि रेटारेटी याचा त्रास खुद्द सुशिलकुमार शिंदे यांनाही झाला. चार हुतात्मा पुतळ्याजवळ रेटारेटामध्ये सुशोभीकरणासाठी लावलेला विद्युत पोल कोसळला, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

 

काँग्रेसचे विविध तालुक्यातील आजी माजी आमदार नगरसेवक विविध पदाधिकारी आपल्या समर्थकांसह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य ही यात आहेत. या मिरवणुकीत सुरुवातीच्या या पट्ट्यात शहरापेक्षा ग्रामीण भागातील आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तसेच इंदिरा कॉंग्रेसच्या महिला सदस्यांची संख्या ही लक्षणीय होती.

 

आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या भगिनी तसेच शिंदे कुटुंबीय या मिरवणुकीच्या अग्रभागी आहेत. याआधी सुशीलकुमार शिंदे यांनी आज सकाळी शहरातील बहुतेक सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शहरातील काही प्रमुख व्यक्तींच्या भेटी घेऊन सदिच्छा स्वीकारल्या मिरवणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या विजयाचा जय घोष करणाऱ्या घोषणा देत देण्यात येत आहे अनेक ठिकाणी फटाक्यांची अतिषबाजी करून तसेच फुले उधळून कार्यकर्त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...