Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Congress MLA Abdul Sattar supports to Harshvardhan Jadhav

काँग्रेसचे बंडखोर आमदार यांचा हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा, झांबड यांच्या पराभरावनंतर काँग्रेसला त्यांची चूक कळेल : अब्दुल सत्तारांनी पत्रकार परिषदेत मांडली भूमिका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 15, 2019, 01:35 PM IST

हर्षवर्धन जाधव भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई

  • Congress MLA Abdul Sattar supports to Harshvardhan Jadhav

    औरंगाबाद - काशीगिरी महाराजांनंतर आता काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सत्तारांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी जाधवच निवडून येणार असा दावा त्यांनी केला. काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड कुठेच रेसमध्ये नाहीत, त्यांच्या पराभवानंतर काँग्रेसला त्यांची चूक कळेल तसेच चंद्रकांत खैरेंचा पराभव करण्यासाठी आपण जाधवांना पाठिंबा देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.


    कन्नडचे आमदार जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. काँग्रेसने औरंगाबाद लोकसभेसाठी सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. मात्र झांबड यांना उमेदवारी देताना मला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत सत्तार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पण एवढ्यावर न थांबता काँग्रेसविरोधांत बंड पुकारत त्यांनी झांबड यांच्या विरोधात उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेतल्यानंतर अब्दुल सत्तार कोणाला पाठिंबा देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

    औरंगाबादेत रंगणार तिहेरी लढत

    औरंगाबादमध्ये 23 एप्रिलला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. औरंगाबादेत शिवसेना-भाजप युतीकडून खा.चंद्रकांत खैरे, वंचित बहुजन आघाडीकडून आ.इम्तियाज जलील तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे विधान परिषदेचे आ.सुभाष झांबड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Trending