आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका महिला सरपंचाला जवळ बसण्यापासून महिला आमदारानेच रोखले, म्हणाली- जमीनवर इतर लोकांसोबत बसा, व्हिडिओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर(राजस्थान)- सोशल मीडियावर ओसियांची आमदार दिव्या मदेरणाचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिव्या यांनी महिला सरपंचाचा आपमान केल्याचे दिसत आहे. सरपंच चंदू देवी यांना आपल्या जवळ बसण्यापासून अडवले आणि त्यांना इतर लोकांसोबत जमिनीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर सरपंच जमिनीवर बसल्या. 


महिला लोप्रतिनिधी असुनही केला अपमान- सरपंच
भर कार्यक्रमात अपमान होउनही सरपंचांनी कोणत्याही प्रकारचा विरोध न करता इतरांसोबत जमिनीवर बसल्या. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही आमदार दिव्या मदरेणा यांची काहीच प्रतिक्रीय आलेली नाहीये. तर सरपंचानी आपल्या प्रतिक्रीया दिलीये. त्या म्हणाल्या आमदार दिव्या स्वत: महिला आहेत आणि मीही महिला आहे तरीदेखील त्यांनी मला बाजुला बसू दिले नाही, त्यांनी माझा अपमान केला आहे. हा त्यांच्या मनाचा छोटेपणा आहे, मला काहीच त्रास झाला नाही. मी तर गावकऱ्यांच्या सांगण्यावरून स्वागतासाठी गेले होते. मी गावची प्रथम नागरिक आहे, त्यामुळेच गावातील लोकांकडून आमदाराच्या बाजुला माझ्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती.


याआधीही झाला आहे व्हिडिओ व्हायरल
याआधीही दिव्या मदेरणा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मथानिया बायपासवर पोलिसांना धमकी देतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अवैधरित्या वसुली करण्याच्या विरोधात त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला जाब विचारला होता. दिव्या माजी मंत्री महिपाल मदेरणा यांची मुलगी आहे.
 

बातम्या आणखी आहेत...