आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आमदाराचा कारनामा, बलात्कार पीडिता आणि कुटुंबाबरोबर फोटो काढून सोशल मीडियावर केला पोस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस आमदार कुलदीप बिश्नोई यांनी पीडितेबरोबरचा पोस्ट केलेला फोटो. - Divya Marathi
काँग्रेस आमदार कुलदीप बिश्नोई यांनी पीडितेबरोबरचा पोस्ट केलेला फोटो.

नवी दिल्ली/रेवाडी - रेवाडी गँगरेप प्रकरणातील पीडितेची ओळख जाहीर करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने मंगळवारी नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाने म्हटले की, रेवाडी सारख्या छोट्या शहरात विशेष शैक्षणिक प्रावीण्य मिळवलेल्या तरुणीची ओळख जाहीर होणे अगदी सोपे होते. हे चुकीचे होते. भविष्यात असे व्हायला नको. 


कोर्टाने म्हटले, कोणत्याही प्रकारे ओळख जाहीर होऊ नये 
जस्टीस मदन बी लोकूर आणि दीपक गुप्ता यांच्या बेंचने बिहारच्या मुजफ्फरपूर शेल्टर होममधील 34 मुली आणि महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या मीडिया कव्हरेजवरील बंदीच्या विरोधात याचिकेवर सुनावणी दरम्यान हे मत व्यक्त केले. कोर्टाने म्हटले कोणत्याही प्रकारे बलात्कार पीडितेची ओळख जाहीर होता कामा वये. पण रेवाडी प्रकरणी चॅनल्सने बेजबाबदारपणा केला. मुलीचे शैक्षणिक यश सांगितले, आम्ही तर पीडितेची मुलाखतही पाहिली. जेव्हा चॅनलवर मुलीच्या पित्याची मुलाखत झाली तेव्हा घरात 50 लोक होते. त्यांनी इतरांना सांगितले असेल. त्यामुळे जवळपास संपूर्ण देशालाच तिच्याबाबत समजले. 


नियमांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जबाबदार कोण? आणि हे सर्व रोखण्यासाठी काय करावे याबाबत अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी जबाबदार असणार्यांना नोटीस जारी करण्याचा सल्ला दिला. पण कोर्टाने अद्याप काहीही आदेश दिलेला नाही. दुसरीकडे सुप्रीम कोर्टाच्या गाइडलाइन्सकडे दुर्लक्ष करत काही नेते पीडिता आणि तिच्या नातेवाईकांना भेटून त्यांच्याबरोबर फोटो काढत सोशल मीडियावरही शेअर करत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...