आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस खासदार थरूर यांनी पुन्हा केली मोदींची स्तुती 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/कोची : पंतप्रधान मोदींच्या कामांची जाहीर स्तुती केल्याने काँग्रेसच्या गोटात लक्ष्य ठरलेले काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शुक्रवारी पुन्हा मोदींची स्तुती केली. मोदींनी रोज एक भारतीय भाषेतील शब्द शिकावा, असे आवाहन केले होते. ते थरूर यांना खूपच भावले. मोदींचे हे आव्हान स्वीकारत आपण रोज इंग्रजी, हिंदी आणि मल्याळम भाषेतील एक शब्द ट्विट करू, असे ट्विट करत थरूर यांनी मोदींच्या या सल्ल्याचेही कौतुक केले. 


मल्याळम मनोरमा न्यूज कॉल्क्लेव्ह-२०१९चे उद््घाटन करताना मोदींनी हे आवाहन केले होते. एक वर्षात माणूस सुमारे ३०० नवे शब्द शिकू शकतो, असेही मोदींनी म्हटले होते. थरूर इतके भारावले की, त्यांनी दुसरे ट्विट केले, 'या आव्हानाला मी रोज एक इंग्रजी, हिंदी आणि मल्याळम शब्द ट्विट करून उत्तर देईन. यामुळे देशाची एकात्मता बळकट होईल. आजचा शब्द आहे बहुलवाद.' हा शब्द त्यांनी इंग्रजीत 'प्लुरलिझम' आणि मल्याळममध्ये 'बहुवचनम' असा लिहिला. 
थरूर म्हणाले, 'रोज नवा शब्द ट्विट करीन' 


यापुढे केवळ स्वार्थासाठी भाषेचा वापर नको : मोदी 
मोदींनी न्यूज कॉल्क्लेव्हमध्ये सांगितले की, कल्पना करा, हरियाणातील लोक मल्याळम भाषा शिकत आहेत आणि कर्नाटकमधील लोक बंगाली भाषा आत्मसात करीत आहेत.दोन राज्यांतील हे अंतर केवळ एक पाऊल पुढे टाकून कमी करता येईल. आजवर भाषेचा वापर केवळ आपल्या स्वार्थासाठी आणि कृत्रिम भिंती उभा करण्यासाठीच झाला आहे.