आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत काँग्रेसच्या नेतेपदी सोनिया गांधींंची निवड, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रस्ताला मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसद भवनात शनिवारी काँग्रेसच्या 52 नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा संसदेतील नेत्या पदावर निवड करण्यात आली आहे. यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींच्या नेतृत्वातच ही बैठक पार पडली. यामध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास काँग्रेस खासदारांनी बहुमताने मंजुरी दिली. यापूर्वी काँग्रेसच्या संसदेतील नेते पदासाठी राहुल गांधींचे नाव चर्चेत होते. परंतु, काँग्रेसच्या परंपरेशी एकनिष्ठ असलेल्या खासदारांनी सोनिया गांधींच्या नावावर भर देत त्यावर शिक्कामोर्तब केला.

 

संसदेत काँग्रेसच्या नेत्यापदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधींनी सर्वांचे आभार मानले. तसेच संसदेमध्ये प्रत्येक भारतीय नागरिकासाठी उभे राहू असे आश्वस्त केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, नवनिर्वाचित लोकसभेचे अधिवेश 17 जून रोजी सुरू होत आहे. यामध्ये कोणते मुद्दे मांडले जातील यावर सुद्धा काँग्रेसच्या खासादारांनी चर्चा केली. सद्यस्थितीला काँग्रेसकडे 52 खासदार आहेत. अशात 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत विरोधीपक्ष नेता सुद्धा होता येणार नाही. यासाठी काँग्रेसला आणखी 3 खासदार लागतील.