आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी ठाकरेंना फसवतेय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माझे प्रेम असून त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांनी चांगले काम करावे. मात्र, त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावर फसवत असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे शहर स्वच्छता करणाऱ्या 'पुणे महापाैर प्लाॅगेथाॅन २०२०' उपक्रमात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली दाेन लाख रुपये कर्जाची माफी फसवी आहे. आम्ही कर्जमाफी केली त्यावेळी निकषांच्या आधारे आमच्यावर आक्षेप घेण्यात आले हाेते. पूर्वीच्या सरकारने २००१ ते २०१६ दरम्यान दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केली. त्यावेळी काही निकष ठेवण्यात आले आणि आताही कर्जमाफीत निकष ठेवले आहेत. सरकारी कर्मचारी, आमदार, खासदार यांना कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही, असे सांगण्यात आले हाेते. या वेळी पण ताेच निकष लावला आहे. आम्ही दीड लाखाची कर्जमाफी केली म्हणजेच हे सरकार आता २०१५ ते २०१९ यादरम्यानची कर्जमाफी करणार आहे. आम्ही मध्यम कर्जाची माफी केली हाेती. परंतु या सरकारने ती केलेली नाही. काँग्रेसच्या बँका, कारखाने आणि सूतगिरण्या यातून सुटण्यासाठी ही कर्जमाफी आहे का? असा प्रश्न उपस्थित करत पाटील म्हणाले, अनेक कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर बाेगस कर्ज घेतलेले आहे. त्यातून मिळणारी रक्कम कारखाने वापरतात. याबाबत काँग्रेसने अट घातलेली असून काँग्रेस नेत्यांचे दाेन साखर कारखान्यांची कर्जांची रक्कम २०० काेटींच्या घरात असून ती कर्जमाफी केली गेली.

कर्जमाफी सांगताना मुख्यमंत्र्यांनी भान ठेवावे

सरसकट कर्जमाफी सांगताना मुख्यमंत्र्यांनी सर्व बाबींचे भान ठेवावे. शेतकऱ्यांच्या नावावर बनावट कर्ज घेतल्याने काही जणांना अटक झाली. ते या कर्जमाफीमुळे सुटतील. दाेन लाख कर्ज थकलेला शेतकरी राज्यात उरलेला नसून शेतकऱ्यांवर माेठा कर्जाचा बाेजा आहे मग नेमकी सरकारची कर्जमाफी काेणाला आहे. केवळ पीककर्ज माफ करून चालणार नाही. कर्जमाफीवरून सरकार पोस्टरबाजी करते पण कर्जमाफी पूर्णपणे फसलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...