आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राज्यामध्ये जातीयवादी राजकारण : पंकजा मुंडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - काँग्रेस राष्ट्रवादीने मराठा समाजाला नेहमीच आरक्षणाचे गाजर दाखविले. मात्र भाजप सरकारनेच प्रत्यक्षात आरक्षण दिले. या दोन्ही काँग्रेसने राज्यात सातत्याने जातीयवादी राजकारण केले आहे, असा आरोप ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी(दि.१८) जिंतूर येथे केला. 

जिंतूर विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुंडे यांनी दोन्ही काँग्रेसवर कडाडून टिका केली. त्याचवेळी आईच्या डोळ्यातील धूर दूर करण्याचे काम केंद्रातील व राज्यातील सरकारने केले. 

काँग्रेसला सत्ताकाळात गोरगरिबांची ही अवस्था कधी दिसली नाही. गरिबांसाठी निवारा उपलब्ध करून द्यावा, असेही काँग्रेसला कधी वाटले नाही. मात्र भाजप सरकारने घरकुल योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना घरे बांधकामासाठी मदत केली. त्याच बरोबर प्रत्येक घरात शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले. पाच वर्षातील सर्वच घटकांसाठीची कामगिरी निश्चितच गेल्या कित्येक वर्षात झालेली नाही. त्यामुळे जनतेने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले. 

व्यासपीठावर माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विलास गिते, लक्ष्मण बुधवंत, अशोक बुधवंत, संजय साडेगावकर, राजेश वट्टमवार, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख उपस्थित होते. 
 
जिंतूर येथे महायुतीच्या उमेदवार मेघना बाेर्डीकर यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शुक्रवारी जाहीर सभा झाली. यावेळी त्यांचे काठी अाणि घाेंगडी देऊन उमेदवार मेघना बाेर्डीकर यांनी स्वागत केले.
 

बहिणीसाठी आले धावून
परळी मतदारसंघात स्वतः उमेदवार असल्याने तेथे अखेरच्या दिवशी यंत्रणा राबविण्या ऐवजी मेघना बोर्डीकर या बहिणीसाठी मी येथे आली आहे. तुम्हीही मेघना हीच पंकजा समजून तिला विधानसभेत पाठवा, असे आवाहन ही करताना राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक या मतदारसंघात बंद करा, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...