आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते ‘गर्व से कहाे हम हिंदू हैं’ म्हणणार ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी सातवा स्मृतिदिन आहे. शिवसेनेबरोबर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कोण कोण नेते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर येणार यासंदर्भात राजकीय वतुर्ळात उत्सुकता आहे.



शिवसेना उघडपणे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा राजकीय पक्ष आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आजपर्यंत स्वत:ला धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणवून घेत आले आहेत. दोन ध्रुवावरच्या या तिन्ही पक्षांना राज्यातल्या राजकीय परस्थिती सध्या एकत्र आणलेले आहे.



राज्यात हे तिन्ही पक्ष सरकार स्थापण्याच्या सध्या प्रयत्नात आहेत. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असतात. सेना-भाजपची २५ वर्षे युती असल्याने गेली सहा वर्षे भाजन नेते या दिवशी नियमीत हजेरी लावत आले आहेत.



राज्यात बदलेल्या राजकीय समिकरणांनी उद्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवतीर्थावर येणे भाग आहे. त्यामुळे आजपर्यंत शिवतीर्थाकडे ढुंकूनही न पाहणारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे कोण, कोण नेते उद्या शिवतीर्थावर येणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे.