आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress NCP Seat Sharing Formula Done In Next 4 5 Days

काँग्रेसच्या 5 विद्यमान खासदारांचा पत्ता होणार कट, कोल्हापूर काँग्रेसकडेच?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत व संभाव्य जागांवाटपाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत व राष्ट्रवादीच्या जागांवाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली.
त्यानुसार प्रदेश काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत विरोधकांचा जोर पाहता राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास अनुकूलता दाखविली आहे. मात्र जागा किती सोडाव्यात याबाबत प्रदेश काँग्रेस व स्क्रिनिंग कमिटीसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे नेतृत्त्वाने सांगितले आहे. त्यानुसार मागील दोन दिवसांत माणिकराव ठाकरे यांनी या कमिटीसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री चव्हाण आज भल्या सकाळीच दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पक्षनेतृत्त्वाची भेट घेऊन संभाव्य जागांवाटपाबाबत चर्चा केली.
दिल्लीतील काँग्रेस नेतृत्त्वाने राज्य पातळीवर राष्ट्रवादीसोबत पुढील दोन दिवसांत वाटाघाटी करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पुढील दोन-तीन दिवसांत प्रदेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चेची पहिली फेरी पार पडेल. त्यानंतर काही जागांबाबत वाद उदभवल्यास तो तिढा केंद्रीय पातळीवर सोडविला जावा असे सांगितले आहे.