आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक परत सुरू, अजित पवारांच्या विधानानंतर चर्चाना उधाण आले होते  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  मुंबई- काही वेळापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक रद्द झाल्याचे खुद्द अजित पवार यांनी सांगितले होते. पण, त्यानंतर ही बैठक परत सुरू झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेशी युती करण्यासाठी दोन्ही पक्षांची ही पहिलीच बैठक आहे. आता नव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची ही बैठक सुरू असल्याचे फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये बारामतीला जात असल्याचे सांगणारे अजित पवार देखील दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी बैठक रद्द झाल्याचे सांगत, मी बारामतीला जात असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील देखील हजर होते, मात्र त्यांनी देखील अजित पवारांच्या या वक्तव्यांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सुरुवातीला ही बैठक काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
 

काय म्हणाले होते. अजित पवार ?


बैठक रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बारामतीच्या दिशेने रवाना झाले. बैठकीच्या बाहेर येताच माध्यमांशी बोलताना, "बैठक रद्द झाली, मी बारामतीला जात आहे," एवढे बोलून अजित पवार निघून गेले. शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.