Home | Maharashtra | Mumbai | Congress, NCP's mahaaghadi final in meeting : Ashok Chavan

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठकीत महाअाघाडीवर शिक्कामाेर्तब : अशाेक चव्हाण

प्रतिनिधी | Update - Sep 12, 2018, 07:40 AM IST

आगामी निवडणुकांसाठी राज्यात समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्य

  • Congress, NCP's mahaaghadi final in meeting : Ashok Chavan

    मुंबई- आगामी निवडणुकांसाठी राज्यात समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यात येणार असल्याचे सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी सायंकाळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, या बैठकीत समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्याबाबत सहमती झाली. अाता लवकरच इतर पक्षांशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.


    या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे, शरद रणपिसे, विजय वडेट्टीवार, संजय निरुपम, सचिन अहिर, नसीम खान, अनिल देशमुख, उपस्थित होते.

Trending